narayan rane talks about balasaheb thackeray in khupte tithe gupte show on zee marathi host by avdhoot gupte sakal
मनोरंजन

Narayan Rane: माझं घर माझ्या डोळ्यासमोर जळत होतं.. आणि बाळासाहेबांचे 'ते' शब्द.. नारायण राणे गहिवरले..

नारायण राणे यांनी सांगितला खास किस्सा...

नीलेश अडसूळ

khupte tithe gupte: नारायण राणे म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं राजकीय व्यक्तीमत्त्व. अनेक राजकीय पदं भूषवलेल्या या नेत्याने महाराष्ट्राचं राजकारण अगदी कोळून प्यायलं आहे.

आजपर्यंत त्यांची वाटचाल तीन पक्षातून झाली. सुरुवातीला ते शिवसेनेत होते, मग ते कॉँग्रेस मध्ये गेले आणि राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी कॉँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

आज जरी ते भाजपमध्ये असले तरी एकीकाळी नारायण राणे यांनी शिवसेना गाजवली आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलन आणि लढ्यांमध्ये ते सक्रिय होते. किंबहुना नारायण राणे हे नावच शिवसेनेमुळे जगापुढे आलं.

त्यामुळे शिवसेनेच्या आठवणी ते कधीही विसरू शकत नाहीत. बाळासाहेब आणि त्यांचे शेवटपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अशीच एक अंगावर काटा आणणारी शिवसेनेत असतानाची आठवण नारायण राणे यांनी सांगितली आहे.

(narayan rane talks about balasaheb thackeray in khupte tithe gupte show on zee marathi host by avdhoot gupte)

गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पडणारा अवधूत गुप्ते आपल्या भेटीला त्याचा 'खुपते तिथे गुप्ते' हा शो घेऊन आला आहे. या शो ची सध्या बरीच चर्चा आहे.

जवळपास 10 वर्षांनी हा मुलाखतीचा कार्यक्रम पुन्हा आला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूफान फटकेबाजी केली. हा भाग चर्चेत असतानाच नवा प्रोमो समोर आला आहे.

'खुपते तिथे गुप्ते'च्या आगामी भागात भाजप नेते नारायण राणे हजेरी लावणार आहेत. त्यांचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक खास किस्सा सांगितला आहे.

यावेळी नारायण राणे म्हणाले, 'सकाळी चार वाजताची घटना आहे.. मी झोपलो होतो आणि रवी नावाचा माझा मित्रा आला आणि म्हणाला तुझं घर जाळलंय.. आणि टीव्हीवर दाखवतायत. तेवढ्यात बाळसाहेबांचा फोन आला, बाळासाहेब इतकंच म्हणाले, नारायण मी पाहतोय.. तुझं घर जळतंय पण एकाच लक्षात ठेव, सोनं जेव्हा जळतं तेव्हा जास्त उजळतं..' अशी भावूक आठवण नारायण राणे यांनी सांगितली. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT