Narendra Modi Happy Birthday Kangana Ranaut Bollywood : esakal
मनोरंजन

Narendra Modi Happy Birthday : भगवान रामासोबत मोदींची तुलना! कंगनाच्या बर्थ डे पोस्टवरुन 'रामायण'?

देशभरातून नागरिकांनी मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

युगंधर ताजणे

Narendra Modi Happy Birthday Kangana Ranaut Bollywood : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहे. मात्र यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या शुभेच्छांनी वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. तिनं मोदींची तुलना चक्क भगवान राम यांच्यासोबत केल्यानं सोशल मीडियावर कंगना चर्चेत आली आहे.

देशभरातून नागरिकांनी मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. यात कंगनाच्या शुभेच्छा आणि तिनं मोदींविषयी केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर, राजकुमार राव, परेश रावल, टायगर श्रॉफ, तुषार कपूर आणि कमल हासन यांनी पोस्ट शेयर करुन मोदींचे अभिष्टचिंतन केले आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

मोदी हे त्यांचा ७३ वा जन्मदिवस साजरा करत असताना देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आय़ोजन देखील करण्यात आले आहे. कंगनानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो आणि पोस्ट शेयर केला आहे. त्यात तिनं मोदीं यांना सर्वाधिक प्रेम मिळालेले नेतृत्व असे म्हणत त्यांची तुलना भगवान राम यांच्यासोबत केली आहे. कंगना आपल्या त्या पोस्टमध्ये म्हणते, मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा....

जगभरातून सर्वाधिक प्रेम आणि आदर मिळालेले नेतृत्व म्हणून मोदी यांच्याकडे पाहावे लागेल. एक साधारण व्यक्ती ते असामान्य व्यक्तिमत्व म्हणून मोदींजी उदाहरण आहे. त्यांनी त्यांच्या कामानं अनेकांना जिंकून घेतले आहे. नव्या भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान खूपच महत्वाचे आहे.

तुमचे नाव हे आता भारताच्या नागरिकांच्या मनात आहे जसे भगवान राम यांचे आहे. तुम्हाला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असे म्हणत कंगनानं मोदींप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या असून तिच्या त्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला त्यावरुन दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तिचा धाकड नावाचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर ती चंद्रमुखी मध्ये दिसणार आहे. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित इमर्जन्सी नावाच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT