Nasir Faraz  Sakal
मनोरंजन

Nasir Faraz Demise : 'दिल क्यों मेरा शोर करे' चे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन

फराज यांच्या अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nasir Faraz Demise : बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निध झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

नासिर फराज यांचे मित्र आणि गायक मुजतबा अजीज नाजा यांनी नासिर फराज यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. नासिर यांना गेल्या अनेक दिवसांपासून ह्रदयाशीसंबंधित त्रास होता.

नासिर फराज यांनी 2010 साली रिलीज झालेल्या काइट्स चित्रपटातील 'दिल क्यूँ मेरा शोर करे' आणि 'जिंदगी दो पल की' ही दोन सुपरहिट गाणी लिहिली होती. याशिवाय नासिर यांनी बाजीराव मस्तानी, क्रिश आणि काबिल यांसारख्या चित्रपटांसाठीही गाणी लिहिली होती.

नासिर फराज यांना हृदयाशी संबंधित आजार होता. सात वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांचे सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 


2013 मध्ये रिलीज झालेल्या 'एक बुरा आदमी' चित्रपटात त्यांनी गीतकार म्हणून काम केले होते. नासिर फराज यांनी 'तुम मुझे बस यूं ही', 'मैं हूं वो आसमान', 'कोई तुमसा नहीं', 'काबिल हूं' आणि 'चोरी चोरी चुपके' या सारखी हृदयस्पर्शी गाणी लिहिली होती. ते उत्तम गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणूनही परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT