national film award 2022 : award winning marathi celebrities shared their feeling sayali sanjeev aroh velankar siddharth menon  sakal
मनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कारानंतर सायली संजीव भावुक, आरोह, सिद्धार्थ भारावले..

राष्ट्रीय पुरस्कारानंतर कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया..

नीलेश अडसूळ

national award 2022 : चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड 'जून' चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन (siddharth menon) याला मिळाला आहे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कारावर आरोह वेलणकरच्या (aroh welankar) 'फनरल' या चित्रपटाने नाव कोरले. या तीनही तरुण कलाकारांनी पुरस्कार मिळाल्या नंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

(national film award 2022 : award winning marathi celebrities shared their feelings sayali sanjeev aroh velankar siddharth menon)

'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामध्ये सायली संजीव (sayali sanjeev)आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्या नंतर सायली भावुक झाली. एक विडिओ शेयर करत ती म्हणाली, 'चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते. आज त्यांची खूप आठवण येत आहे. मला असा एखादा मोठा पुरस्कार मिळावा अशी त्यांची खूप इच्छा होती. या चित्रपटासाठी माझ्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे.' तर

तर 'जून' चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मेनन म्हणाला, 'मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोय. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. हा पुरस्कार मी आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. मला 'जून' चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला याचा सर्वात जास्त आनंद आहे.'

तर ''फनरल'' च्या यशानंतर अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला, 'आज मी खूप खुश आहे, आमच्या 'फनरल' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. याआधी हा पुरस्कार 'आनंदी गोपाळ' या मराठी चित्रपटाला मिळाला होता. या वर्षी तो 'फनरल' मिळाला. सलग दोन वर्षे सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपटांची निवड होणे ही मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारामागे आमच्या संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे.' अशा शब्दात या कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT