मनोरंजन

नवरात्री स्पेशल; अभिनेत्री रीना मधुकरच्या आयुष्यातील 'आदिशक्ती'

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा सण, प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या आदिशक्तीचा सण! ९ दिवस देवींच्या ९ रुपांची पूजा केली जाते.

युगंधर ताजणे

मुंबई - नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा सण, प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या आदिशक्तीचा सण! ९ दिवस देवींच्या ९ रुपांची पूजा किंवा उपासना केली जाते. या सणाच्या निमित्ताने स्त्रियांच्या स्त्रीपणाचा आदर केला जातो, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याविषयी वाटणारा आदर व्यक्त केला जातो. ज्या शक्तीची पूजा संपूर्ण देशात केली जाते ती शक्ती, आदिशक्ती आपल्या सोबतच आहे... मग ती आईच्या रुपात असो किंवा बहिण, मैत्रिण, बायको असो. अभिनेत्री रीना मधुकरने देखील ‘तिच्या आयुष्यातील तिची शक्ती कोण? आणि तिच्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्या तिच्यासाठी पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत. असं सांगितलं आहे.

रीनाची ‘आदिशक्ती’ नक्की कोण या विषयी व्यक्त होताना रीनानं सांगितले की, " "तुला ज्याची आवड आहे ते तू कर, मी आहे तुझ्या सोबत आणि एवढं मात्र लक्षात ठेव की कधी ही कोणावर अवलंबून राहायचं नाही", आईच्या या दोन वाक्यांनी मला नेहमी धीर यायचा. मला डान्सची प्रचंड आवड आहे पण त्यासाठी बाबांचा विरोध होता , त्यांच्यामते मी घरातल्यांसारखं डॉक्टर, इंजिनिअर व्हावं पण माझी आवड आईला समजली होती . "तिला जे मनापासून करावंसं वाटतयं ते तिला करू द्या, ती जिथे कुठे शिकायला, प्रॅक्टिसला जाईल तिथे मी तिच्या सोबत असेन", असं समजावून आईने बाबांना विश्वासात घेऊन त्यांची परवानगी मिळवली. त्यानंतर मी आईच्या पाठिंब्यामुळे कला क्षेत्रात आले. माझी आई खूप स्वावलंबी आहे आणि तिने तिची ही शिकवण मला आणि माझ्या बहिणीला दिली. 'कोणावर ही अवलंबून राहू नये' हा कानमंत्र तिने आम्हाला दिला जो खरंच उपयोगी पडला. या वयातही आई टेक्नॉलॉजीसोबत जुळवून घेते, 'मला यातलं काही कळत नाही' असं तिचं कधीच म्हणणं नसतं, 'गोष्ट नवीन आहे तर मी ती शिकून घेईन आणि स्वतः वापर करेन' हा जो तिचा स्वभाव आहे तो मला प्रचंड आवडतो आणि आपसूक तिचे हे गुण आणि संस्कार आमच्यावर झाले आणि त्यामुळे 'आई' ही माझी खऱ्या अर्थाने 'शक्ती' आहे.

पुढे रीना सांगते, "'मन उडू उडू झालं' मालिकेत 'मनमोकळेपणाने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगणारी' सानिका तुम्ही पाहिली आहे. खऱ्या आयुष्यात मी तशीच आहे आणि जशी दीपिका आहे तशी माझी सख्खी बहिण रूपा आहे. मी जरी मोठी असली तरी रूपा अगदी मालिकेतल्या दीपिका सारखी आहे. समंजस, शांत, सर्वांना सांभाळून घेणारी, जेव्हा आई आणि माझ्यामध्ये तू तू मैं मैं होतं तेव्हा मध्यस्थी घेणारी ही रूपा असते. आमच नातं फार सुंदर आणि मैत्रिणी सारखं आहे. वयाने मी तिच्या पेक्षा जरी मोठी असली तरी ती माझं काहीही चुकलं, अगदी सुरुवातीपासून, माझा एखादा सीन तिला नाही आवडला किंवा अपेक्षेप्रमाणे तो नीट नाही झाला की ती मोकळेपणाने "मला हा सीन नाही आवडला, यापेक्षा जास्त चांगला होऊ शकला असता" असं थेट सांगते.

थोडक्यात काय तर ती माझी बेस्ट समीक्षक आहे. इतकेच नव्हे तर शाळेत असताना माझे कोणाशी वादविवाद झाले तर रूपा येऊन सर्व सांभाळून घ्यायची. असं आहे आमचं नातं... ती माझी शक्ती आहेच पण तिच्यातले दोन गुण जे मला जास्त प्रेरित करतात ते म्हणजे तिचं कामा प्रती असलेलं 'डेडीकेशन आणि चिकाटी'. 'आई' आणि 'बहीण' यांच्या रूपातून रीनाला दोन आदिशक्तींची साथ मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

IND vs SA, 3rd T20I: भारतीय गोलंजांचा अचूक माऱ्यासमोर द. आफ्रिका १२० धावांच्या आतच ऑलआऊट; भारतासमोर सोपं टार्गेट

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT