Navya Nanda Instagram
मनोरंजन

अमिताभ यांच्या नातीचा 'कांदेपोहे' कार्यक्रम उरकला;फोटोंची चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून नव्या नंदाच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या बातम्या कानावर येत होत्या.

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबातलं सगळ्यात चर्चेतलं लग्न ठरणार आहे ते त्यांच्या नातीचं,म्हणजे नव्या नंदाचं. नव्या(Navya) ही श्वेता नंदा(Shweta Nanda) हिची मुलगी. अर्थात अमिताभ यांच्या मुलीची मुलगी. घरातल्या पुढच्या पिढीतलं हे पहिलंच लग्न म्हणजे तामझामही तसाच असणार नाही का. नव्याच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेच आहे. तिचा खरंतर आर्यन खानसोबतचा 'तो' फेक फोटो समोर आला तेव्हा बच्चन आणि खान दोन्ही कुंटुंबांवर वादाचं मोठं वादळच येऊन धडकलं होतं. पण पुढे ते सगळं शांतही झालं. त्यानंतर मात्र कोणाना कोणाबरोबर उगाचच नव्याचं नाव जोडलं जाऊ लागलं. पण आता उगाच ती चर्चा कशाला. थेट मुद्द्यावरच येऊया की.

नव्या आजच्या पिढीतली,म्हणजे सोशल मीडियाशी तिचं अतूट नातं हे असणारंच नाही का. तर त्याच 'सोशल नात्यावर' खरी उतरुन नव्या नेहमीच सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो,व्हिडीओ पोस्ट करीत सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिनं पोस्ट केलेला एक फोटो जोरदार व्हायरल झाला होता. त्या फोटोतील तिच्या 'ग्रे हेअर' ची खूप चर्चा झाली होती. तिनं फोटोला कॅप्शन देताना आपल्याला 'ग्रे हेअर' आवडतात असं म्हटलं होतं. पण आता तिने तिच्या आयुष्यातील काही खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत,ज्यामुळे बच्चन कुंटुंबात सनई-चौघडे वाजणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे.

नव्या नंदानं आपल्या इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांच्या घरात जया बच्चन(Jaya Bachchan),श्वेता नंदा आणि स्वतः नव्या नंदा छान नटून-थटून बसलेल्या दिसत आहेत. सुंदर ज्वेलरी,भरजरी कपडे असा एकंदरीत शाही थाट त्या फोटोतनं दिसत आहे. बच्चन कुटुंबातील तीन पिढ्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या तीन सुंदर स्त्रियांचे फोटो पाहून चाहत्यांनी मात्र वेगळ्याच चर्चेला सुरुवात केली आहे. त्यात नव्याचं लग्न ठरलंय ही मोठी चर्चा आहे. तिच्या लग्नानिमित्तानं तर सगळे एकत्र जमलेयत नाही नं किंवा नटून-थटून नव्याचा कांदेपोहे कार्यंक्रम तर पार पडला नाही नं अशा चर्चा रंगल्यात. आता तिच्या या फोटोवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर ज्या फोटोंवरुन आपण एवढी चर्चा करीत आहोत ते फोटो आहेत अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं काढलेले. आणि या फोटोत दिसणाऱ्या नटलेल्या जया आजी,आई श्वेता आणि मुलगी नव्या मात्र झकास दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT