Nawazuddin Siddhiqui Bollywood Actor Want to play  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddhiqui : 'मला ओशोंची भूमिका साकारायचीय', नवाझुद्दीनं असं का म्हणाला?

बॉलीवूडमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या अभिनेत्यांमध्ये नवाझुद्दीनचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Nawazuddin Siddhiqui Bollywood Actor Want to play : बॉलीवूडमध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या अभिनेत्यांमध्ये नवाझुद्दीनचे नाव घ्यावे लागेल. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यानं एका मुलाखतीमध्ये जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची चर्चा होताना दिसत आहे.

नवाझुद्दीन सिद्धिकीचा रौतु की बेली नावाचा चित्रपट हा चर्चेत आला आहे. नवाझुद्दीन हा सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशावेळी त्याला जे काही प्रश्न विचारण्यात आले त्यातील एका प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर हे मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याचं झालं असं की, नवाझुद्दीन गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं जी नवी माहिती दिली त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

वेगवेगळ्या भूमिका करुन चाहत्यांचे मनोरंजन करणे हे नवाझुद्दीनचे मुख्य उद्धिष्ट राहिले आहे. त्याच्या गँग्स ऑफ वासेपूर, सीरिअस मॅन, हड्डी, फिरकी अली, सिक्रेड गेम्स सारख्या कलाकृतीतून नवाझुद्दीननं त्याची क्षमता सिद्ध केली आहे. अशातच त्यानं आता आपण एका वेगळ्या भूमिकेचा विचार करत असल्याचे सांगत देशातल्या त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे नाव घेत आपण ती व्यक्तिरेखा साकारणार आहोत. असे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करायला आवडते. ते मी एक आव्हान म्हणून स्विकारतो. ज्या भूमिकांमध्ये काही आव्हानात्मक आहे जी भूमिका तुम्हाला काही शिकवून जाणारी आहे अशा भूमिकांना न्याय मला द्यायला आवडते. असे नवाझुद्दीननं यावेळी सांगितले आहे. तुला आणखी कोणत्या भूमिकेत काम करायला आवडेल असे नवाझुद्दीनला विचारण्यात आले त्यावेळी त्यानं दिलेल्या उत्तराची चर्चा होताना दिसत आहे.

मला जर भविष्यात संधी मिळाली तर ओशो यांची भूमिका करण्याची खूप इच्छा आहे. असे सांगून नवाझुद्दीननं चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता रवि किशन हा ओशोंची भूमिका करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता नवाझुद्दीननं देखील आपल्याला त्यांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT