Nawazuddin Siddiqui, Urvashi Rautela  Instagram
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui आणि उर्वशी रौतेला विरोधात कायद्याची नोटीस, जाहिरातीत काम करणं पडलं महाग.. जाणून घ्या प्रकरण

The Central Consumer Protection Authority-CCPA नं एका गेमिंग कंपनीसाठी जाहिरात करण्याच्या प्रकरणात दोघा सेलिब्रिटींना ही नोटीस पाठवली आहे.

प्रणाली मोरे

The Central Consumer Protection Authority-CCPA नं एका गेमिंग कंपनीसाठी जाहिरात करण्याच्या प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाला नोटिस पाठवली आहे.

लोटस ३६५ या गेमिंग कपंनीसाठी नवाझुद्दीन सिद्दिकी आणि उर्वशी रौतेलानं जाहिरात केली आहे. सीसीपीए नं त्या गेमिंग कंपनीला देखील कायदेशीर नोटिस पाठवली आहे. सीसीपीएनं एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीच्या आधारावर ही नोटिस पाठवली आहे.

जाहिरातीत कंपनीनं दावा केला होता की त्यांची फर्म २०१५ सालापासून भारतातील नंबर वन स्पोर्ट्स एक्सेंज आहे. या दाव्यावर आता सीसीपीएनं काही प्रश्न निर्माण केले आहेत. आता नवाझुद्दीन आणि उर्वशी हे दोघे सेलिब्रिटी तसंच ती गेमिंग कपंनी काय उत्तर देते याची वाट पाहिली जात आहे.(Nawazuddin Siddiqui and urvashi rautela gets notice for endorsing misleading advertisement )

कंपनीनं जो दावा केला आहे त्यासंदर्भातले पुरावे सादर करावेत असं नोटिसमध्ये सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त नवाझुद्दीन सिद्दिकी आणि उर्वशी रौतेलाला सीसीपीएनं नोटिस पाठवत प्रश्न केला आहे की जाहिरात करण्याआधी त्यांना कसं कळलं की कंपनीनं जो दावा केला आहे तो खरा आहे.

कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीनं सेलिब्रिटींना सांगितलं आहे की कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी थोडी मेहनत करा. म्हणजे मिनिस्ट्रीनं सेलिब्रिटींना जाहिरात करण्याआधी थोडी चौकशी करा असा सल्ला दिला.

खोटा दावा करणारी जाहीरात साइन केली म्हणून नवाझुद्दीन आणि उर्वशी सहित आणखी तीन सेलिब्रिटींना देखील नोटिस जारी केली गेली आहे. सीसीपीएनं या प्रकरणात अॅक्शन घेण्याआधी गेमिंग कंपनी आणि सेलिब्रिटींकडून यासंदर्भात स्पष्टिकरण मागितलं आहे.

माहितीसाठी सांगतो की नवाझुद्दीन सिद्दीकी आपली पत्नी आणि भावाशी सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी आणि त्याची एक्स वाईफ आलियानं एकमेकांवर गंभीर आरोप लावले आहेत. आता प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT