Nawazuddin Siddiqui Bollywood Actor trolled esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : 'नवाझनं स्टाफला देखील सोडलं नाही, त्यानं...' भावानंच केला धक्कादायक खुलासा!

नवाझुद्दीनच्या भावानं आता त्याच्यावर जे काही आरोप केले आहेत ते मोठे धक्कादायक आहेत. यापूर्वी देखील शमास सिद्धिकीनं नवाझुद्दीनवर केलेल्या आरोपांमुळे लक्ष वेधले गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui Bollywood Actor trolled : नवाझुद्दीनच्या भावानं आता त्याच्यावर जे काही आरोप केले आहेत ते मोठे धक्कादायक आहेत. यापूर्वी देखील शमास सिद्धिकीनं नवाझुद्दीनवर केलेल्या आरोपांमुळे लक्ष वेधले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया हे चर्चेत आले आहे. अजुन त्यांच्यातील वाद संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद कोर्टापर्यत गेला आहे. नवाझुद्दीननं देखील आमच्यात घटस्फोट झाला असून आम्ही मुलांसाठी एकत्र आहोत असे म्हटले होते. तसेच मी बोलत नाही याचा अर्थ आलिया जे काही सांगते आहे ते खरे आहे असे नाही. मी माझ्या मुलांसाठी शांत आहे. त्यांच्यावर या साऱ्या प्रकरणाचे काय परिणाम होतील हे माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. असे नवाझुद्दीननं सांगितले होते.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

यासगळ्यात नवाझुद्दीनच्या भावानं शमासनं यापूर्वी देखील आपल्या भावाविषयी स्पष्टपणे सांगितलं होतं. नवाझच्या चेहऱ्यावर जाऊ नका. तो जसा दिसतो तसा नाही. त्याची आणि आलियामध्ये बऱ्याच दिवसांपासून आलबेल नव्हते. त्यांच्यातील भांडणं आज ना उद्या कधी ना कधी समोर येणारच होती. आता ते लोकांना कळाले म्हणून वेगवेगळे प्रश्न पुढे आले आहेत.

शमासचे म्हणणे आहे की, नवाझुद्दीन हा त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या स्टाफसोबत चांगला वागत नव्हता. तो त्यांना मारहाण करत असे. अमर उजालानं प्रकाशित केलेल्या एका बातमीमध्ये नवाझबाबत हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्या मारहाणी संबंधीचा एक पुरावा देखील व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नवाझुद्दीनची डोकेदुखी वाढली आहे.

यापूर्वी नवाझुद्दीनच्या पत्नीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप करुन मोठी खळबळ उडवून दिली होती. यावरुन दोन्ही सेलिब्रेटींमध्ये कशाप्रकारचा वाद आहे हे चाहत्यांना कळून चुकले होते. आता होळीच्या निमित्तानं नवाझच्या भावानं एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत तो स्टाफला कशाप्रकारे मारहाण करत होता, यासंबंधीची माहिती शेयर केली आहे.त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT