Nawazuddin Siddiqui mansion 
मनोरंजन

नवाजुद्दीनने मुंबईत बांधला मोठा बंगला

बंगल्याचं नाव ठेवलं..

स्वाती वेमूल

मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न उराशी बाळगून असंख्य लोक दिवसरात्र मेहनत करतात. ते पूर्ण करण्यात काहींना यश मिळतं तर काहीजण त्यात अपयशी ठरतात. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) याने नुकताच मुंबईत मोठा बंगला बांधला आहे. हा बंगला बांधण्यासाठी तीन वर्षे लागली असून त्याची रचना ही नवाजच्या गावातील त्याच्या जुन्या घरासारखी आहे. खुद्द नवाजुद्दीनने या घराच्या इंटेरिअरमध्ये लक्ष घातलं होतं. या बंगल्याला नवाजुद्दीनने त्याच्या वडिलांचं नाव 'नवाब' असं दिलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकीला नुकतंच सुधीर मिश्राच्या 'सिरियस मेन'मधील दमदार अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळालं होतं. तो सध्या कंगना रणौतसोबत 'टिकू वेड्स शेरू'मध्ये काम करत आहे. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असून कंगना त्याचं दिग्दर्शन करतेय. याशिवाय जोगिरा सारा रा रा, बोले चुडियाँ आणि हिरोपंती २ या चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे.

नवाजने बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान मिळवल्यानंतरही तो साधेपणानंच राहणं पसंत करतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो बॉलिवूड पार्ट्यांमध्ये न जाण्याबाबत व्यक्त झाला होता. "बॉलिवूड पार्ट्यांपासून अलिप्त राहण्याचं कारण म्हणजे मला स्टारडम आणि ग्लॅमरचं जग आवडत नाही. चित्रपटसृष्टीतील कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये जाण्यापेक्षा मला सामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं. मला तिथे खूप खोटेपणा दिसतो, जो मला आवडत नाही", असं तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

Morning Breakfast Recipe: Fit राहायचंय? मग सकाळी नाश्त्यात बनवा ज्वारीच्या पीठापासून मस्त नाश्ता, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT