Nawazuddin Siddiqui News esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui News: 'मला माझ्या मुलांना भेटायचं आहे', अखेर मुलांसाठी नवाजने बायकोसमोर घेतलं नमतं, सामंजस्य करार?

Latest Bollywood News: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजकाल त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui News: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आजकाल त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याचे गेल्या अनेक दिवसांपासून त्याची पत्नी आलियासोबत वाद सुरु आहेत.

आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले आहेत तर नवाजनेही तिच्या आरोपांचे खंडन करत ती हे सगळं केवळ पैशासाठी करत असल्याचं म्हटलं आहे.

या दोघांमध्ये सुरू असलेला वाद न्यायालयीन खटल्याबाबत दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. कधी आलिया सोशल मीडियावर नवाजबद्दल व्हिडिओ शेअर करते तर कधी नवाज तिच्याबद्दल मेसेज लिहितो, तर कधी नवाज असे करतो. पण आता या बिघडलेल्या प्रकरणाबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे.

आता बातमी समोर येत आहे की त्याला शक्य तितक्या लवकर आपल्या मुलांना भेटायचं आहे आणि त्यामुळे करण्यासाठी तो त्याची याचिका मागे घेण्यासही तयार असल्याचं त्याचं म्हणनं आहे.(Latest Marathi News)

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, मला फक्त आपल्या दोन्ही मुलांना भेटायचं आहे आणि तसं झाले तर तो त्याची याचिका मागे घेईल.

त्याच्या वकिलाने सांगितले की, मुले दुबईतील त्यांच्या शाळेतून बेपत्ता होती आणि नवाज त्यांचा शोध घेऊ शकला नाही. त्यामुळेच त्यांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेत मिळू शकणारा मर्यादित दिलासा मला माहीत आहे.

नवाज बऱ्याच दिवसांपासून आपल्या मुलांना भेटला नाही आणि त्यांच्याबद्दल काळजीत आहे. आलियाने मुलांना भेटण्याची परवानगी दिली तर तो आपली याचिका मागे घेईल.

नवाजच्या वकिलाने त्याचा बचाव केला, तर त्याची पत्नी आलियाचा वकील शिखर खंडेलवाल म्हणाला की, " याचिका निष्फळ होती कारण ती दाखल केली तेव्हा माझा क्लायंट अभिनेत्याच्या आईच्या बंगल्यात दोन्ही मुलांसह राहत होता." (Marathi Tajya Batmya)

पुढे तिचा वकिल म्हणाला की, माझा क्लायंट हे प्रकरण मिटवायला तयार आहे. पण जेव्हा ती मुलांसोबत नवाजच्या आईच्या घरी राहात होती, तेव्हा मुलं कुठे आहेत हे त्याला कळलं नाही असं कसं होईल? तो आपल्या मुलांना भेटायला मोकळा आहे. केव्हाही भेटू शकतो, पण तो स्वत: त्यांना भेटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT