Nawazuddin siddiqui Esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui Latest: नव्या केसमध्ये अडकला नवाझुद्दीन सिद्दिकी.. अभिनेत्यानं बंगाली समाजाच्या भावना दुखावल्याचा होतोय आरोप

गेले काही दिवस नवाझुद्दीन सिद्दिकी बायकोसोबतच्या वादामुळे कोर्टकचेरी करण्यात अडकला होता आणि चर्चेत आला होता.

प्रणाली मोरे

Bollywood News Update : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. बंगाली समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपामुळे नवाझुद्दीन आणि कोका कोलाच्या भारतीय डिव्हिजनच्या सीईओ विरोधात केस दाखल झाली आहे.

अभिनेत्यानं स्प्राइट शीतपेयाच्या जाहिरातीत काम केलं होतं,ज्या जाहिरातीचं मूळ शूट हे हिंदीत झालं होतं. या जाहिरातीच्या हिंदी व्हर्जनवर कोणताही आक्षेप घेतला गेलेला नाही पण कोलकाताच्या एका वकीलानं बंगाली व्हर्जनमधील जाहिरातीतील एका ओळीवर आक्षेप घेतला आहे.(Nawazuddin siddiqui: case filed against actor for hurting sentiments of bengali community)

LiveMint च्या एका रिपोर्टनुसार,कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील दिब्यान बॅनर्जी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. दिब्यान यांनी कोर्टांत सांगितलं की,''कोका-कोलानं आपल्या स्प्राइट या शीतपेयासाठी बनवलेली जाहिरात हिंदीत होती. आमचा यावर काहीच आक्षेप नाही. आमचा आक्षेप हा सध्या टी.व्ही वाहिन्या आणि वेबसाईट्सवर बंगाली जाहिरात दाखवली जातेय त्यातील बंगाली भाषेतील डबिंगवर आहे.

नवाझुद्दीन सिद्दिकी एके ठिकाणी जाहिरातीत खिल्ली उडवत हसताना दिसत आहे आणि म्हणतोय,''शोजा अंगुले घी न उठले,बंगाली खाली पेटे घुमिए पोरे''. याचा अर्थ असा होतो की बंगाली लोकांना सहज कुठली गोष्ट मिळाली नाही,तर ते उपाशीपोटीच झोपतात''.

''यामुळे आम्हाला वाटतं की बंगाली समाजाच्या भावनांचा अपमान झाला आहे. आम्हाला वाटतं की भविष्यात अशा प्रकारच्या नौटंकीला आणि चुकीच्या गोष्टींना बढावा मिळू नये''.

रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे की कंपनीनं या तक्रारीनंतर नवाझुद्दीनच्या बंगाली व्हर्जनमधील जाहिरातीला हटवलं आहे, आणि स्प्राइट इंडिया द्वारा जारी केलेल्या नोटिसमध्ये म्हटलं गेलं आहे की,''शीतपेयाच्या या बंगाली जाहिरातीमुळे लोकांची मनं दुखावली याचा आम्हाला खेद आहे आणि कंपनी बंगाली भाषेचा सम्मान करते''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT