Aaliya Siddiqui ex wife esakal
मनोरंजन

Aaliya Siddiqui ex wife : 'ममा तुझ्यासोबत तो फोटोमध्ये कोण आहे'? नवाझुद्दीनच्या मुलीचा प्रश्न, आलिया म्हणते...

नवाझुद्दीन सिद्धिकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात काही आलबेल नाही हे एव्हाना साऱ्या जगाला कळलं आहे.

युगंधर ताजणे

Aaliya boyfriend says will tell daughter at right time : नवाझुद्दीन सिद्धिकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात काही आलबेल नाही हे एव्हाना साऱ्या जगाला कळलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या व्हायरल होताना दिसत आहे. कोर्टानं देखील त्यांना मुलांसाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. मात्र आलियाचा अंदाज काहीसा वेगळाच आहे.

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये आलिया सहभागी झाली आहे. अशावेळी तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कित्येक गोष्टी सांगून प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावरुन तिला त्या शो मध्ये सहभागी झालेल्या काही स्पर्धकांनी खडसावलेही होते. त्यात पूजा भट्टचा समावेश होता. पुजानं तर तिला चांगलेच सुनावले होते.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

हे बघ आलिया तू प्रत्येकवेळी तुझं लग्न मोडलं, तुझा संसार आता राहिलेला नाही असं म्हणून लोकांकडून सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करु नको. माझंही लग्न मोडलं होतं. अशावेळी आम्ही त्या गोष्टीवरुन काहीही बोलत नाही. तू मात्र त्यावरुन सरळ सरळ लोकांच्या भावनेशी खेळते आहे असेही पूजानं तिला म्हटले होते. यासगळ्यात आलियानं दिलेल्या काही मुलाखतीचा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा होते आहे.

आलियानं तर तिच्या त्या मुलाखतीमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. आलियाला दोन मुलं आहेत. ती बाहेर देशात शिक्षण घेत आहेत. नवाझ आणि तिच्या नात्याबद्दल आलिया म्हणते, अजून आमचा अधिकृतरीत्या घटस्फोट झालेला नाही. त्यात आलियाचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल झाल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. त्यासगळ्यात आलियानं तिच्या मुलीच्या एका प्रश्नावर दिलेले उत्तर लक्ष वेधून घेत आहे.

आलिया म्हणते, मी माझ्या मुलीला अजून काही सांगितलेले नाही. तिला काही माहिती नाही. माझ्या मुलीनं तो व्यक्ती कोण आहे जो माझ्याबरोबर असतो. मी तिला हे सगळं योग्य ती वेळ आल्यावर सांगणार नाही. आता काही सांगितले तर तिला ते पटणार नाही. समजणारही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT