Nawazuddin Siddiqui Instagram
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui च्या मोलकरणीचा नवा व्हिडीओ..म्हणतेय,'नवाज सर माफ करा..'

नवाझुद्दिननं आपल्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या मोलकरणीनं केला होता. आता तिच्या नव्या व्हिडीओनं खळबळ उडाली आहे.

प्रणाली मोरे

Nawazuddin Siddiqui : काही दिवस आधी नवाझुद्दिन सिद्दिकीच्या मोलकरणीचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात तिनं आरोप केले होते की अभिनेत्यानं दुबईत एकटं असताना तिच्यासोबत छेडछाड केली होती.

हाऊस मेड सपना रॉबिननं सांगितलं होतं की तिच्याकडे खाण्यापिण्यास काहीच नाहीय. त्यानंतर नवाझुद्दिनची पत्नी आलियाचे वकील सतत हाऊस मेडला घेऊन ट्वीस करताना दिसत आहेत.

या सगळ्या वादा दरम्यान सपना रॉबिनचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिनं म्हटलं आहे की, जे झालं ते योग्य झालं नाही. अभिनेता खूपच चांगला माणूस आहे. आणि ती माफी मागताना दिसत आहे. तसंच तिनं अभिनेत्यावर लावलेले सगळे आरोपही मागे घेतले आहेत.(Nawazuddin Siddiqui house help allegations against actor are false)

नवाझुद्दिनच्या हाऊस मेडनं व्हिडीओत म्हटलं आहे की,'' मी नवाज सरांची हात जोडून माफी मागते. तसं तर मी माफीच्या लायक नाहीच आहे. मी जे काही केलं ते माझ्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे केलं. तुमच्यासोबत काही चुकीचं व्हावं असं मला वाटत नाही. सोशल मीडियावर जो व्हिडीओ पाहिला तो चुकीचा आहे. मॅडमनी तुमच्यावर जे आरोप लावलेयत ते सगळे खोटे आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही घरी परत या''.

माहितीसाठी इथे सांगतो की नवाझुद्दिन सिद्दीकीची पत्नी आलिया जिची केस सध्या कोर्टात पोहोचली आहे. तिचे वकील रिजवान सिद्दीकीनं आरोप केला होता की काही लोक सपनाला धमकावत आहेत. ते म्हणतायत की ते तिला काम-पैसा सगळं देतील फक्त तिनं अभिनेत्याच्या विरोधात एक शब्द बोलू नये. आलियाच्या वकीलांनी ट्वीटमध्ये देखील दावा केला होता की अभिनेत्याचा सेक्रेटरी अनुप सपनाला धमकावत आहे.

माहितीसाठी इथं सांगतो की पहिल्यांदा नवाजुद्दिन सिद्दीकीच्या हाऊस मेडनं रडत रडत आपला एक व्हिडीओ शेअर केला होता. जिथे ती बोलताना दिसत आहे की नवाझनं तिला दुबईत एकटीला सोडलं. मी विनंती करत होती मला माझी सॅलरी देऊन इथून बाहेर काढ. मला माझ्या घरी भारतात जायचं आहे. मला तिकीटीचे पैसे दे आणि माझा राहिलेला पगार दे.

नवाजुद्दिन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीनं अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते. तिनं सासरच्या लोकांवर कौटुंबिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसंच,आलियाच्या सासूने देखील तिच्यावर अनेक आरोप केले होते आणि यासंबंधित पोलिसात केसही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT