nava with wife aaliya 
मनोरंजन

'माझ्या गरोदरपणात नवाज त्याच्या गर्लफ्रेंडशी गप्पा मारण्यात व्यस्त असायचा'- नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीचा आरोप

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींसाठी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. यासोबतंच आलियाने त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांवर छळ केल्याचा आरोपही लावला आहे. इतकंच नाही तर नवाजच्या वागणूकीबद्दलही तिने अनेक खुलासे केले आहेत.

आलियाने एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय, 'मी नवाजुद्दीन सिद्दीकीला २००३ पासून ओळखते. आम्ही एकत्र राहत होतो. त्याचा भाऊ शमास देखील आमच्यासोबत राहत होता. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मग नवाज आणि मी लग्न केलं. सुरुवातीपासूनंच आमच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी होत्या. मला वाटलं की हे नंतर बंद होईल. मात्र १५-१६ वर्ष झाली आहेत पण माझा मानसिक छळ करणं काही बंद झालं नाही.'

आलियाने पुढे सांगितलं, 'मला हे अगदी चांगलं आठवतंय की जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि लग्न करणार होतो तेव्हा तो आधीपासूनचं कोणासोबत तरी एका रिलेशनशिपमध्ये होता.आमच्यात या कारणामुळे लग्नाआधी आणि लग्नानंतरही भांडण होत होती. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा मी सगळ्या चेकअपसाठी स्वतः गाडी चालवत जायचे. माझे डॉक्ट मला म्हणायचे की मी वेडी आहे आणि अशी पहिलीच स्त्री आहे जी स्वतःच्या डिलीव्हरीसाठी एकटी आली आहे. जेव्हा माझ्या प्रसुतीकळा सुरु झाल्या होत्या तेव्हा नवाज आणि त्याचे पालक तिथेच होते. मात्र जेव्हा मला त्रास होत होता तेव्हा माझ्या पतीने मला साथ दिली नाही. तो फोनवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारायचा. मला याबाबत सगळं माहित आहे कारण फोनच्या बिलाचे स्टेटमेंट्स यायचे.'

आलियाने पुढे असंही सांगितलं की, 'शमासने मला फोनबिल दिले होते. तो जवळपास ३-४ मुलींसोबत गप्पा मारत होता. जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा देखील नवाजच्या मनात काहीच भावना नव्हत्या. अशी छोटी छोटी कारणं आहेत ज्यामुळे मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. मी नवाजला हे कधीच सांगितलं नाही की त्याच्या भावानेच मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या.'     

nawazuddin siddiqui wife says he used to talk his girlfriend when i was pregnant  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : मालाड मध्ये किरकोळ वादातून तरुणाचा खून; एका आरोपीला अटक, तीन फरार

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

SCROLL FOR NEXT