navazuddin 
मनोरंजन

नवाझुद्दीन सिद्दीकी करतोय शेतात काम, गावातील व्हिडिओ केला शेअर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी घरात बसून कंटाळले आहेत. त्यामुळे कित्येक सेलिब्रिटी गावी जाऊन वेळ घालवतात.  नवाझुद्दीक सिद्दीकी सध्या शेतात काम करण्यात व्यस्त आहे. उत्तर प्रदेशमधील बुढाना गावी तो सध्या राहतोय. लॉकडाऊन दरम्यान नवाझुद्दीन गाडी घेऊन त्याच्या गावच्या घरी पोहोचला होता. आणि तिथे त्याचा वेळ घालवण्यासाठी तो शेतात काम करत आहे. नवाझुद्दीनने त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो शेतात काम करताना दिसून येतोय. 

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात तो शेतात काम करतोय. त्यानंतर तो शेतातंच जमा झालेल्या पाण्याने स्वतःचे हात पाय साफ करतोय. त्याने शेतक-यासारखं डोक्यावर कपडा देखील बांधला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शन देखील तसंच लिहिलंय. 'आजचं काम पूर्ण झालं असं लिहिलंय.' 

नवाझुद्दीन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मात्र यावेळी तो सिनेमामुळे किंवा प्रोजेक्टमुळे चर्चेत नाहीये. तर त्याच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. नवाझुद्दीनला त्याची पत्नी आलियाने घटस्फोटाच्या पोटगीची भली मोठी रक्कम मागितली होती आणि त्याला कायदेशीर नोटीस बजावली होती. 

आलियाचे वकिल अभय सहाय यांचं म्हणणं आहे की, 'माझी क्लाईंट आलियाने ७ मेला अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्याच घटस्फोट आणि पोटगीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं होतं की अनेक गोष्टी या खूप गुप्त आणि संवेदनशील आहेत आणि ही नोटीस ७ मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सअपवर द्वारे पाठवली गेली आहे.'

आलिया आणि नवाझुद्दीनची रिलेशनशिप आधीपासूनंच चर्चेत होती. आलियाने याविषयी सोशल मिडियावर देखील आगपाखड केली होती.   

nawazuddin siddiqui working in his farms took to instagram to share his video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

उल्हासनगरच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत! महायुतीतील धुसफूस पुन्हा उघड; भाजप नगरसेवकाची कमलेश निकम यांच्यावर टीका

'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT