Nawazuddin Siddiqui's mother Mehrunisa Siddiqui filed FIR  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: नवाझुद्दीनच्या आईची सुनेविरोधात पोलिसांकडे तक्रार, 'माझ्या सुनेनं...'

सासूच्या तक्रारीनंतर आता वर्सोवा पोलिसांनी नवाझुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

युगंधर ताजणे

Nawazuddin Siddiqui : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करुन असणारा अभिनेता म्हणून नवाझुद्दीनचे नाव घ्यावे लागेल. मोठ्या संघर्षातून स्वताची वेगळी वाट तयार करणाऱ्या नवाझुद्दीनच्या घरात आता वाद तयार झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर तो वाद व्हायरल झाला आहे.

एएनआयनं जे ट्विट केले आहे त्यातून नवाझुद्दीनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नवाझुद्दीनच्या आईनं मेहरुन्निसा सिद्धिकी यांनी आपली सून झैनाबच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात जमिनीच्या वादानं आता थेट पोलिस ठाण्यापर्यत धाव घेतली आहे.

सासूच्या तक्रारीनंतर आता वर्सोवा पोलिसांनी नवाझुद्दीनच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून नवाझुद्दीच्या घरातमध्ये मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. तो वाद त्याची पत्नी झैनाब उर्फ आलिया आणि त्याची आई मेहरुन्निसा यांच्यात आहे.

वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये कलम ४५२, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झैनाब ही नवाझुद्दीनची दुसरी पत्नी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

Latest Marathi News Live Update : संजय शिरसाट यांच्या मुलानंतर आता मुलगीही निवडणूकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल

Nanded News : वाह रे पठ्ठ्या... आठ वर्षांत १६ ब्रेकअप... तरी नव्या पार्टनरच्या शोधात!

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत नोकरी लागल्याचं कारण सांगून तिला नेलं अन् तिच्यासोबत...

SCROLL FOR NEXT