Nawazuddin Siddiqui, raj thackeray, MNS SAKAL
मनोरंजन

'ठाकरे' नंतर Nawazuddin Siddiqui पुन्हा मराठी सिनेमात करणार काम? मराठी भाषा दिनानिमित्त मोठी घोषणा

नवाझुद्दीन सध्या कौटुंबिक वादाच्या चक्रव्यूहात पुरता अडकला आहे

Devendra Jadhav

Nawazuddin Siddiqui News: अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीने मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. नवाझुद्दीन सध्या कौटुंबिक वादाच्या चक्रव्यूहात पुरता अडकला आहे.

या वादातून दिलासा मिळावा म्हणून आज नवाझुद्दिन शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या आश्रयाला गेलाय, अशी चर्चा होती. पण खरं कारण मात्र काहीतरी वेगळंच आहे. नवाझभाईने स्वतः ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे.

(Nawazuddin Siddiqui's celebrate marathi bhasha din with Raj Thackeray)

"मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे ! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच !सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !!

लवकरच अभिजित पानसे यांच्या सोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र", असं ट्विट करत नवाझुद्दीनने शिवतीर्थावर तो का गेला होता याचा खुलासा केलाय.

त्यामुळे नवाझुद्दीन सिद्दीकी 'ठाकरे' सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे

दरम्यान नवाझुद्दीन सिद्दिकीच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र वादळ सुरु आहे. नवाजच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर बराच वाद झाला. त्यातच काही दिवसांपुर्वी त्याच्या मोलकरणीनेही नवाजवर गंभीर आरोप केले.

पण नंतर मोलकरणीने नवाजची माफी मागत ते आरोप मागे घेतले.नवाझुद्दीन आणि त्याची आई यांच्यावर नवाझच्या बायको आलियाने कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहे

नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर केलेले आरोप हे आता नवाझुद्दीनसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. या सगळ्यांचा आमच्या मुलांवर परिणाम होतोय. असं भावनिक आवाहन करत नवाझने बायकोच्या आरोपावर मौन सोडले.

या घरगुती वादग्रस्त गोष्टीतुन वेळ काढत नवाझ मराठी भाषा दिनानिमित्त नवीन कलाकृती चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

नवाजने ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली. तेव्हापासून नवाझचे उद्धव आणि राज ठाकरेंसोबत चांगले संबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT