Nawazuddin Siddiqui: Esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: बायकोनंतर आता घरकाम करणाऱ्या महिलेनं देखील...नवाझुद्दीन आणखी अडचणीत

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवाज त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आहे. त्याच्या बायकोने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत. तर आता घरकाम करणाऱ्या महिलेनं तिला दुबईत एकटे सोडल्याचा आणि पगार न दिल्याचा आरोप केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण सपना रॉबिन हिने ट्विटरवर रडताना आणि मदतीची याचना करतांनाचा एक व्हिडिओ नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीचा वकील रिझवान यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबतच वकिलाने एक लांबलचक स्टेटमेंटही जारी केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने सपनाला चुकीच्या पद्धतीने कामावर घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

वकिलाचा दावा आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीने दुबईच्या रेकॉर्डमध्ये सपनाचा एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून उल्लेख केला होता. तर प्रत्यक्षात अभिनेत्याने आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सपनाला कामावर ठेवलं होते. सपना दुबईत नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आणि मुलांसोबत राहत होती.

व्हिडिओमध्ये सपना म्हणतेय, 'मी नवाजुद्दीन सरांच्या घरी काम करते. मॅडम गेल्यानंतर सरांनी मला व्हिसा दिला होता आणि माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापून घेतील असे सांगितले होते. पण मला दोन महिन्यांपासून मला पगार मिळाला नाही आणि त्यामुळे मला खूप अडचणी येत आहेत . सध्या मी दुबईत एकटिच आहे. माझ्याकडे खायला काही नाही.'

'माझ्याकडे एक पैसाही नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की मला येथून बाहेर काढा आणि माझा पगार फायनल करा. मला भारतात माझ्या घरी जायचे आहे. मला बसचे तिकीट हवे आहे आणि माझा पगार हवा आहे.' हा व्हिडीओ आणि स्टेटमेंट शेअर करण्यासोबतच आलियाच्या वकीलाने मुलीला वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली आहे.

2021 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया आणि शोरा दुबईला गेले होते अशी माहिती समोर येत आहे. पण आलिया जानेवारी 2023 मध्ये भारतात परतली आणि तेव्हापासून तिचे पती आणि सासरच्यां मंडळीसोबत भांडण होत आहे. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT