naya rivera 
मनोरंजन

धक्कादायक! मुलासोबत सरोवरामध्ये पोहण्यासाठी गेलेली अभिनेत्री बेपत्ता, ४ वर्षांचा मुलगा बोटीवर सापडला एकटा...

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- हॉलीवूड अभिनेत्री नाया रिवेराबाबात धक्कायदायक बातमी समोर येत आहे. नाया पोहण्यासाठी गेली होती मात्र ती परत आलीच नाही. नाया बेपत्ता झाल्याची बातमी ऐकून इंडस्ट्रीमधील सगळ्यांना धक्काच बसला आहे. रिवेरा कित्येक हॉलीवूड सिनेमांमध्ये दिसून आली आहे. तसंच तिच्या Glee या हिट म्युजिकल सिरीजसाठी ती खूप प्रसिद्ध आहे. बुधवारी दुपारी रिवेराचा ४ वर्षांचा मुलगा जोसे कॅलिफोर्नियातील पीरु सरोवरमध्ये एका बोटीत एकटा सापडला आहे. २०१४ मध्ये रिवेराने Ryan Dorsey सोबत लग्न केलं होतं. मात्र २०१८ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. रिवेराच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तणावाचं वातावरण आहे. 

नाया रिवेराबाबत शेरिफ विभागाने ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, 'पीरु सरोवरात बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. हरवलेली व्यक्ती ३३ वर्षीय नाया रिवेरा आहे. तिचा शोध सुरु आहे.' रिवेरा बुडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका आंतरराष्ट्रीय वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, तिला शोधण्याचं काम अजुनही सुरु आहे. असं म्हटलं जात आहे की तिने दुपारी ३ तासांसाठी बोट भाड्याने घेतली होती आणि तिच्यासोबत तिचा लहान मुलगा देखील होता. जेव्हा बोट वेळेत परत आली नाही तेव्हा तेथील कर्मचारी त्या बोटजवळ पोहोचला. मात्र तिथे त्याला केवळ तिचा ४ वर्षांचा मुलगा सापडला आणि नाया बेपत्ता असल्याचं कळालं.

नाया तिच्या मुलासोबत पोहत होती. मात्र तिचा मुलगाच केवळ बोटीपर्यंत परत येऊ शकला. पोलिसांतर्फे तिचा शोध आणि रेस्क्यु ऑपरेशन केलं गेलं मात्र नोयाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. संध्याकाळ नंतर तिचं हे शोधकार्य गुरुवार सकाळपर्यंत थांबवण्यात आलं होतं.

नाया रिवेराच्या मुलाने सांगितलं की, त्याच्या आईने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली पण ती परत आली नाही.रिवेराने ७ जुलै रोजी तिची शेवटची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली होती. रिवेराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन तिचा आणि तिच्या मुलाचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, 'केवळ आपण दोघं.'

चाहते आणि सेलिब्रिटी तिच्या या शेवटच्या पोस्टवर आता कमेंट करत आहेत. अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया लिहिल्या असून 'तिच्यासाठी प्रार्थना करा' असंच म्हटलंय.  

naya rivera missing and her son found alone on rented boat in middle of piru lake in california  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT