Nayanthara And Vignesh welcomed twin sons,here is the beautiful meanings behind their sons. Esakal
मनोरंजन

Nayanthara Twin: नयनतारा-विघ्नेशच्या जुळ्या मुलांची अनोखी नावं; 'युइर' आणि 'उलगम' चा नेमका अर्थ काय?

दक्षिणेतील लेडी सुपरस्टार नयनतारा लग्नानंतर ४ महिन्यातच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली आहे.

प्रणाली मोरे

Nayanthara Twin:दक्षिणेतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विघ्नेश शिवनने यावर्षीच ९ जून रोजी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं आणि ४ महिन्यानंतर लगेचच ते दोघे आई-वडील होण्याचं सुखही अनुभवतायत. नयनतारा आणि विघ्नेश यांच्या घरी दोन जुळ्या मुलांनी जन्म घेतलाय आणि आपल्या या दोन लाडक्या मुलांचं नाव त्यांनी ठेवलं आहे युइर आणि उलगम. नयनतारा-विघ्नेशच्या मुलांच्या नावाविषयी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत आहे. सर्वांना जाणून घ्यायचंय आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या मुलांच्या अनोख्या नावाचा अर्थ...चला आपणही जाणून घेऊया.(Nayanthara And Vignesh welcomed twin sons,here is the beautiful meanings behind their sons.)

लग्नाच्या केवळ चारच महिन्यात नयनताराच्या या गूड न्यूजने तिच्या चाहत्यांना चक्रावून सोडलं आहे. सोशल मीडियावर लोक नयनताराला प्रश्न विचारुन भंडावून सोडताना दिसतायत. लोक विचारु लागलेयत, 'कोणाची मुलं आहेत ही?' लोकांनी विचारलंय, 'लग्नानंतर ३ ते ४ महिन्यात मुलं कशी होऊ शकतील?' आता बातमी समोर आहे की,नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. नयनतारानं आपल्या मुलांची नावं 'युइर' आणि 'उलगम' अशी ठेवली आहेत. आता सोशल मीडियावर एकीकडे जिथे लोक नयनताराला शुभेच्छा देताना दिसत आहेत तिथे लोक तिला तिच्या मुलांच्या या हटके नावाचा अर्थही विचारताना दिसत आहेत.

'युइर' आणि 'उलगम' हे दोन तामिळ शब्द आहेत. दोघांचा अर्थही खूप सुंदर आहे, तामिळमध्ये जिथे 'युइर'चा अर्थ 'जीवन' असा आहे तर 'उलगम'चा अर्थ 'विश्व' असा आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांच्यावर दक्षिणेतूनच नाही तर बॉलीवूडमधूनही अनेक सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. विकी कौशल,अर्जुन कपूर सारख्या मोठमोठ्या कलाकारांनी नयनतारा आणि विघ्नेशला शुभेच्छा दिल्या आहेत. मुलांच्या चिमुकल्या पावलांची झलकही नयनतारा आणि विघ्नेशनं सोशल मीडियावर आपल्या पोस्टच्या माध्यमातून दाखवली आहे.

आपल्या मुलांची ही छोटीशी झलक चाहत्यांसोबत नयनतारा-विघ्नेशनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विघ्नेशने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, ''नयन आणि मी 'अम्मा' आणि 'अप्पा 'बनलो आहोत. आम्हाला जुळी मुलं झाली आहेत. आमची प्रार्थना,पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुमच्या सारख्या चाहत्यांच्या आमच्या प्रतीच्या शुभ विचारांमुळेच आम्हाला दोन मुलांचं आई-वडील होण्याचं सुख लाभलं आहे. आमच्या 'युइर' आणि 'उलगम'साठी आपले आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. आता आयुष्य आणखी सुंदर बनलं आहे''.

नयनतारा लवकरच शाहरुखसोबत त्याच्या 'जवान' सिनेमातून आपल्याला दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT