Nayanthara-Vignesh  esakal
मनोरंजन

Nayanthara Twins Names: असं पहिल्यांदाच घडतंय..! नयनताराने वेगळ्याच अंदाजात सांगितली तिच्या जुळ्या मुलांची नावं, भर स्टेजवर..

सकाळ डिजिटल टीम

Nayanthara Twins Names: साउथ सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते.

मात्र या जोडप्याची लग्नाच्या फोटोपेक्षा जास्त तिच्या मुलांची चर्चा झाली. त्याच्या लग्नाला केवळ चार महिने झाले आणि चार महिन्यांनंतरच दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

या जोडप्याने अजूनही त्याच्या मुलांचे चेहरे दाखवले नसून आता नयनतारानं एका कार्यक्रमामध्ये तिच्या जुळ्या मुलांची नावं चाहत्यांना सांगितली आहेत.

नयनतारानं चेन्नईमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामधील नयनताराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आता अलीकडेच, एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चेन्नईला पोहोचलेल्या नयनताराने तिच्या दोन्ही मुलांची नावे अतिशय खास आणि मनोरंजक पद्धतीने उघड केली.

आपल्या मुलाच्या नावाची घोषणा करताना नयनताराचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

हा व्हिडीओ नयनताराच्या एका चाहत्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नयनतारा तिच्या जुळ्या मुलांची नावं सांगताना दिसत आहे. नयनताराच्या एका मुलाचं नाव उयिर रुद्रोनिल एन शिवन आणि दुसऱ्या मुलाचे नाव उलग धैवाग एन शिवन असं आहे.

Nayanthara Vignesh

नयनतारा ही 'जवान' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच जवान या चित्रपटात विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर आणि योगी बाबू यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT