Nayanthara-Vignesh  esakal
मनोरंजन

Nayanthara-Vignesh:चार महिन्यांतच आई बाप कसे झाले?

नयनतारा विघ्नेशला तामिळनाडू सरकारचा प्रश्न...

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश यांनी रविवारी सोशल मीडियावर मुलांचे पाय दिसत असलेले फोटो पोस्ट करत जुळ्या मुलांचे स्वागत केल्याची घोषणा केली . विघ्नेशने "नयन आणि मी अम्मा आणि अप्पा झालो आहोत. आम्हाला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे,"असं कॅप्शन दिलं आणि सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला. लग्नाच्या चार महिन्यात मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला असावा अशी चर्चा रंगली आहे.

यावर्षी जानेवारीपासून भारतात सरोगसी ही बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय स्थितीमुळे जोडप्याला मुलं जन्मास घालण्यास अडचण असेल तेव्हा सरोगसी पर्याय असतो. त्यामुळे तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी वैद्यकीय सेवा संचालनाल या प्रकरणी या जोडप्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले.

सोमवारी, चेन्नई येथे पत्रकार परिषदेदरम्यान चार महिन्यांपूर्वी लग्न झालेले जोडपे सरोगसीद्वारे गर्भधारणा करू शकतात का आणि वेळेचे काही बंधन आहे का? असा प्रश्न जेव्हा तामिळनाडूचे आरोग्य मंत्री  सुब्रमण्यम यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या सरोगसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या व्यक्तींचे वय २१ वर्षांच्या पुढे आणि ३५ वर्षांच्या आत असेल आणि त्यांच्या घरच्यांची संमती असेल, तर कायद्याने त्यांना सरोगासीचा मार्ग स्वीकारण्यास परवानगी असते. तसेच यासंदर्भात वैद्यकीय सेवा संचालनालयाला चौकशी करण्याचे आणि जोडप्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले जातील असे सांगितले.

दरम्यान, नयनतारा आणि विघ्नेश यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या मुलांचे स्वागत केले असले तरी अद्याप या जोडप्याने याप्रकरणी अधिकृत घोषणा केलेली नाही.

यापूर्वी बॉलिवूडमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी सरोगसी हा पर्याय निवडला आहे. यामध्ये शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन, प्रियांका चोप्रा-निक जोनास यांचाही सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT