Sushant Singh Rajput Sakal
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण: फरार शेजाऱ्याला अखेर NCBने केली अटक

साहिल जवळपास नऊ महिने फरार होता.

स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणातील ड्रग्जशी संबंधित असलेल्या एका ड्रग्ज तस्कऱ्याला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. याबाबतची माहिती एनसीबी अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. अटकेतील आरोपी हा दिवंगत अभिनेता सुशांतचा शेजारी आहे. साहिल शाह उर्फ फ्लाको असं त्याचं नाव असून तो ३१ वर्षांचा आहे. साहिलला दुबईहून मुंबईला परतल्यानंतर अटक करण्यात आली, असं एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

सुशांतच्या मृत्यूशी संबंधित एका ड्रग प्रकरणातील आरोपीच्या चौकशीदरम्यान साहिलचं नाव समोर आलं होतं, असे अधिकाऱ्याने सांगितलं. गेल्या वर्षीच्या गांजा जप्तीच्या प्रकरणात तसंच 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल, असंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात NCB अधिकाऱ्यांनी त्याचं नाव पहिल्यांदा उघड केल्यानंतर साहिल जवळपास नऊ महिने फरार होता. जून 2021 मध्ये, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित एजन्सीच्या ड्रग्ज तपासात तो प्रमुख संशयित असल्याचा दावा केल्यानंतर साहिलने या प्रकरणात अटकेपासून बचाव करण्यासाठी याचिका दाखल केली होती. याआधी कनिष्ठ न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

जून 2020 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर, NCB त्याच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलने तपास करत आहे. NCB ने सप्टेंबर 2020 मध्ये सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांसह अनेकांना अटक केली. रिया जवळपास एक महिना तुरुंगात होती, तर शौविकची जवळपास तीन महिन्यांनंतर जामिनावर सुटका झाली. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल ९ World Cup ट्रॉफी अन् T20I मध्ये १६ प्लेअर ऑफ द मॅच... स्टार अष्टपैलूने इतिहास घडवत रचना नवा विश्वविक्रम

Pune Passport Helpdesk: पासपोर्ट अर्जदारांसाठी प्रादेशिक कार्यालयात ८ तारखेला जनसंवाद सत्र; तक्रारी व शंका निवारणाची संधी

Latest Marathi News Live Update: पुणे-नाशिक रस्ता पाण्याखाली

आमिर खानने लग्नात चांदीचं पैंजण का घातलेलं? व्हिडिओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात-

Fake Milk Racket Manchar: मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भंडाफोड; २६ जणांवर गुन्हा, १३ अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT