DEEPIKA KARISHMA PRAKASH 
मनोरंजन

ड्रग्स चॅट प्रकरणात NCB ने दीपिकाची मॅनेजर करिश्माला समन्स बजावल्यानंतर आता दीपिकाचीही चौकशी होण्याची शक्यता

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड सेलिब्रिटींच्या ड्रग्स चॅटच्या आधारावर आता एनसीबी ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित मोठ्या ड्रग पेडलर्सपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आता दीपिका पदूकोणची देखील एनसीबी चौकशी करण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही तासातंच एनसीबी दीपिका पदूकोणला समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत.  आता एनसीबीच्या टीमने दीपिका पदूकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. तेव्हा करिश्माची ड्रग्स प्रकरणी आज मंगळवारी चौकशी करण्यात येईल असं म्हटलं जातंय.   

इंडिया टुडने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने केलेल्या खुलास्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदूकोणचं नाव समोर आलं आहे. एनसीबीच्या या तपासात सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाने सांगितलं की करिश्मा आणि दीपिका पदूकोणमध्ये काय चर्चा झाली होती. यामध्ये म्हटलंय की D, K ला  विचारतेय की तुझ्याकडे माल आहे का? यावर उत्तर देत K म्हणते की हो. पण घरी आहे. मी बांद्राला आहे. यावर K अमित नावाच्या कोणा एका व्यक्तीचं नाव घेऊन सांगते की मी अमितकडे पाठवू शकते. यावर D म्हणते हो. प्लीज. थोड्यावेळाने K म्हणते, अमित घेऊन जात आहे. यावर D म्हणते हॅश आहे ना. तर K म्हणते हॅश नाही गांजा आहे. 

ड्रग्स तपास प्रकरणी D N S K अशा नावांच्या व्यक्तींचा नावाच्या खुलासा झाला आहे. बॉलीवूडमधील या व्यक्ती D दीपिका पदूकोण, N नम्रता शिरोडकर, S श्रद्धा कपूर, K करिश्मा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

ncb may summon deepika padukone targets drug peddlers drug syndicate sushant case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT