ncb says charge sheet Bollywood actor Arjun rampal leave India go to south Africa 
मनोरंजन

अर्जुन रामपाल आफ्रिकेला पळून जाणार होता, एनसीबीला होता संशय 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता अर्जुन रामपाल याच्याविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून अर्जुनच्या मागे एनसीबीचा ससेमिरा लागला होता. त्यावरुनच या तपासातून वेगळा गौप्यस्फोट होणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. आता जी माहिती पुढे आली आहे त्यावरुन अर्जुन रामपाल हा आफ्रिकेला पळून जाणार होता. असे एनसीबाकडून सांगण्यात आले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे एका चार्जशीटमधून हा खुलासा करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे त्या चार्जशीट अनुसार एनसीबीनं रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रीकेच्या काऊंसलेट जनरला फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिली आहे.

बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या घरातून एनसीबीच्या काही अधिका-यांना औषधाच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. आता एनसीबीनं एक चार्जशीट फाईल केली आहे. त्यात अर्जुनला ड्रग्ज प्रकरणात संशयित असे मानले गेले आहे. एका वृत्तवाहिनीला त्या चार्जशीटविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माहिती दिली की, अर्जुन हा आफ्रिकेला पळून जाणार होता. त्या चार्जशीटमध्ये तसा उल्लेख आहे. 

चार्जशीटमध्ये असलेल्या माहितीनुसार मुंबई एनसीबीनं 3 डिसेंबर 2020 रोजी रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिकाच्या काऊंसलेट जनरला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एनसीबीनं या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. त्यात बॉलीवूडमधील अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच प्रकरणात अर्जुन रामपालकडे संशयित म्हणुन पाहिले जात आहे. आम्हाला असा संशय आहे की, तो आफ्रीकेत पळून जाण्याची शक्यता आहे. त्याच पत्रात असे म्हटले आहे, अर्जुन रामपालच्या पत्नीचा भाऊ अगिसीआलोस डिमेट्रिएडसला यापूर्वी दोन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अगिसीआलोस हा साऊथ आफ्रिकन नागरिक आहे.

एनसीबीनं साऊथ आफ्रिकन काऊंसलेटला असे सांगितले आहे की, जर अर्जुन रामपालनं तुमच्याकडे व्हिसासाठी अॅप्लिकेशन केले तर त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी. यानंतर एनसीबीनं अर्जुन रामपालला एनडीपीएसच्या कायद्यानुसार 14 डिसेंबर रोजी समन्स पाठवले होते. आणि 16 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT