Rhea Chakraborty  esakal
मनोरंजन

Rhea Chakraborty: सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा!

वांद्रे येथील घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यांना अटक करण्यात आली होती.

Vaishali Patil

Rhea Chakraborty: बॉलिवूडचा लोकप्रिय आणि टॅलेंटेड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला आता जवळपास तीन वर्ष झाले आहेत तरी देखील त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही. 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ३ वर्षांनंतर नवा ट्विस्ट येताना दिसत आहे.

या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यांना अटक करण्यात आली होती. अनेक दिवस त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने सुप्रीम कोर्टाला सांगतिले की, ड्रग्जशी संबंधित चौकशीच्या संदर्भात रियावर नोंदवलेल्या खटल्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रियाला दिलेल्या जामिनाला NCB आव्हान देणार नाही.

मंगळवारी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले की, एनसीबी जामिनाला आव्हान देत नाही, परंतु एनडीपीएस) कायद्याच्या कलम 27-ए अंतर्गत या संदर्भात हा केस खुला ठेवावा.

रिया चक्रवर्तीला जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑक्टोबर 2020 च्या आदेशाविरुद्ध एनसीबीच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते.

NCB ने रियावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्याच्या कठोर कलम 27-A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात "बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीस मदत करण्यास प्रोत्साहन देणे" यासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि जामिनावर बंदी घालण्याची तरतूद होती.

मात्र अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठी पैसे देणे म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी होत नाही, असं उच्च न्यायालयाने नमूद करत रियाला जामिन मंजूर केला होता.

या निर्णयानंतर रिया चक्रवर्ती हिला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती स्मितहास्य करतांना दिसत आहे. तिने हात फोल्डिंग इमोजीसह 'कृतज्ञता' असं कॅप्शन दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT