Utkarsh Shinde on Maharashtra Politics News: Esakal
मनोरंजन

Maharashtra Politics: 'मतदारांच्या बोटाला 'शाही' नाही तर चुना' अभिनेत्याची पोस्ट व्हायरल...

Vaishali Patil

Utkarsh Shinde on Maharashtra Politics News: आज दुपारपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात अशा घडामोडी घडल्या की त्याने मागच्या वर्षी राजकारणात झालेल्या सत्तांतरणाचा दुसरा भागच आज रिलिज झाला की काय असं चित्र दिसतंय.

राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंड केले. त्यामुळे राज्यात राजकीय भुकंप झाला.

त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

त्यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळच उडाला. आता या राजकीय घडामोडीवर अनेक राजकिय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे, शरद पवार , राज ठाकरे, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यातच आता या राजकिय परिस्थीतीवर मनोरंजन विश्वातील कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. त्यात आता उत्कर्ष शिंदे यानेही सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत प्रतिक्रिया दिली आहे.

ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे हा बिग बॉस मराठीतून त्याच्या दमदार खेळाने प्रेक्षकांच्या मनात पोहोचला.

उत्कर्ष शिंदेने दोन पोस्ट केल्या आहेत. आता त्यात पहिले त्याने 'मतदारांच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना' अशी मार्मिक पोस्ट शेयर केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटो देखील शेयर केला आहे.

Utkarsh Shinde on Maharashtra Politics News
Utkarsh Shinde on Maharashtra Politics News

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा तीन पक्षाचे सरकार आले आहेत. त्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचा सामावेश आहे.

अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT