मनोरंजन

माझा विश्वास नाही: माने प्रकरणावर खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले...

अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट केल्याप्रकरणी त्या मालिकेतून काढून टाकल्याची घटना घडलीय.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट केल्याप्रकरणी त्या मालिकेतून काढून टाकल्याची घटना घडलीय. त्यावरुन अनेकांनी त्यांच्याबाजूनं प्रतिक्रिया दिली आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) यांनी देखील आपल्या व्हिडिओतून आपण माने यांच्या बाजुनं असल्याचे सांगितलं आहे. माने यांना राजकीय पोस्ट करणं महागात पडल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, यांनी देखील माने यांच्यावतीनं प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) म्हणाले, मला हा विषय महत्वाचा वाटतो. अशा पद्धतीनं खरचं होतं का, समाजमाध्यमांवर राजकीय भूमिका घेतल्यास कलाकारांना मालिकांमधून काढलं जातं का, हे मला सांगायचं आहे. जी गोष्ट पटत नाही त्याबद्दल मी सातत्यानं सांगत आलो आहे. मात्र मला अशाप्रकारचा कधीही अनुभव आलेला नाही. मी देखील एका वाहिनीसाठी मालिका करत होतो. पण मला त्यात कधीही आडकाठी कुणी केली नाही. वेगवेगळ्या वाहिन्यांवर मी काम केले. कोणत्याही वाहिन्यांकडून अशा प्रकारचं वर्तन केलं जातं. असं मला तरी दिसून आलेलं नाही. अशी प्रतिक्रिया डॉ.कोल्हे यांनी आपल्या व्हिडिओतून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

सहा महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचं नख लागलं, ९ वर्षीय चिमुकलीचा रेबिजमुळे मृत्यू

जादूटोण्याच्या संशयातून हल्ला; महिलेच्या गळ्यावर सत्तूरने वार; कुठं घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT