मनोरंजन

'वरणभात लोन्चा' प्रदर्शनाआधीच वादात; महिला आयोगाचं प्रसारण मंत्रालयाला पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महेश मांजरेकर दिग्दर्शित "वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा" या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्या ट्रेलरवरुनच हा वाद सुरु झाला आहे. या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहलंय.

आगामी मराठी चित्रपट "वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा" चे ट्रेलरवरुन हे पत्र त्यांनी लिहलंय. या ट्रेलरमधील थेट अशी लैंगिक दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहण्यात आलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अशा लैंगिक सामग्रीच्या खुल्या प्रसारणाचा निषेध या पत्राद्वारे करण्यात आला आहे.

दिवंगत ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. येत्या १४ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT