Neena Gupta Birthday Esakal
मनोरंजन

Neena Gupta: 'वाढदिवस काय करता शोक व्यक्त करा...' 64 व्या वाढदिवशी निना गुप्ताचा सल्ला! नेटकऱ्यांना बसला धक्का

Vaishali Patil

Neena Gupta Birthday: अभिनेत्री नीना गुप्ताही बॉलिवूडमधील एक कसदार अभिनेत्री आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी बरोबरच तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखली जाते.

नीनानं आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगासमोर बेधडकपणे ठेवल आहे. नीना गुप्ता या रविवारी 64 वर्षांच्या झाल्या आहेत.

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी आणि त्याचबरोबर अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, नीनाची मुलगी मसाबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नीना गुप्ताची मुलगी मसाबा तिला वाढदिवसानिमित्त तिचे विचार विचारते.

ज्याला उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या की, 60 वर्षांनंतर वाढदिवस येतो तेव्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे असं त्यांना वाटते.

व्हिडिओमध्ये मसाबा ही नीना गुप्ताला म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे. याला उत्तर देताना नीना म्हणते, हो माझा वाढदिवस आहे, माझ्या वाढदिवशी या भेटवस्तूबद्दल धन्यवाद.

यानंतर जेव्हा मसाबा तिला तिचे विचार विचारते, त्यावर नीना म्हणते की, 60 वर्षांनंतर जेव्हा वाढदिवस येतो तेव्हा लोकांनी शोक व्यक्त करायला पाहिजे, आनंद नाही. कारण आता वय कमी होत आहे, म्हणजे जगण्याचे वय.

यामुळे मला पार्टी करायची नाही आहे. मी आता मस्त जेवण बनवायला सांगतिलं आहे जे मी माझ्या कुटूंबासोबत बसून घाईल. बस्स..

नीना गुप्ता यांनी स्वर्ग, खलनायक, बढाई हो, पंगा, शुभ मंगल ज्यादा सावधान, डायल 100, सरदार का ग्रैंडसन, वध, गुडबाय, मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, ऊंचाई, शिव शास्त्री बालबोआ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या वयात देखील नीना यांनी स्वत:ला खुप फिट ठेवलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT