Neena Gupta esakal
मनोरंजन

Neena Gupta: 'तू आहेस माझ्या मुलीचा बाप'! नीनानं 'त्या' क्रिकेटरला सांगितल्यावर...

मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींची गोष्टच वेगळी असते, त्यांचे लाईफस्टाईल, समाजातील वागणे बोलणे याला काही खास असे निकष नसतात.

सकाळ डिजिटल टीम

Neena Gupta Bollywood actres: मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींची गोष्टच वेगळी असते, त्यांचे लाईफस्टाईल, समाजातील वागणे बोलणे याला काही खास असे निकष नसतात. त्यांना धुडकावून लावत आपल्या अटी-शर्थीनुसार ते बिनधास्तपणे जगत असतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्तांचा तो धक्कादायक किस्सा अजुनही अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही.

बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयानं नीना यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही नीना यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावी आहे. सध्या त्यांच्या उंचाई या चित्रपटाची चर्चा आहे. सुरज बडजात्या यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन, अनुपमन खेर, बोमन इराणी, डॅनी, नीना गुप्ता आणि सारिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोशल मीडियावर हा चित्रपट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

उंचाईविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी चित्रपटातील कलाकार अनेक शो मध्ये जावून त्याचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी केलेला खुलासा हा आता चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्या धक्कादायक प्रवासाविषयी सांगितले होते. ज्या जगप्रसिद्ध क्रिकेटरसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते ते नेहमीच वादात राहिले.

क्रिकेटविश्वामध्ये आपल्या फलंदाजीनं चाहत्यांना नेहमीच प्रभावित करणाऱ्या सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्याबद्दल वेगवेगळे किस्से सांगितले जातात. या स्टार फलंदाजाच्या प्रेमात नीना गुप्ता पडल्या. त्यांनी एकमेकांना डेटही केले. त्यावेळी त्यांच्या या प्रेमप्रकरणाची सगळीकडेच चर्चा होते. त्यांना मोठ्या वादाचाही सामनाही करावा लागला होता. दरम्यान नीना गुप्ता या प्रेग्नंट राहिल्यानंतर तर त्यांच्या घरात मोठे वादळ तयार झाले होते.

नीना यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मला जेव्हा मी व्हिव्हियनच्या मुलाची आई होणार आहे तेव्हा मी त्याला ही गोष्ट सांगितली. त्यानं मला ही प्रेग्नसी सुरु ठेवण्यास सांगितले. मात्र माझ्या कुटूंबावर या गोष्टीचा मोठा परिणाम झाला होता. दुसरीकडे त्याच्याही कुटूंबातील सदस्यांनी नाराजी दर्शवली होती. अखेर मोठ्या प्रयत्नानं त्याचे वडील तयार झाले होते. ही आठवण सांगताना नीनाजी भावूक झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT