masaba gupta and satyadeep misra Sakal
मनोरंजन

Masaba Gupta Wedding: नीना गुप्ता झाली सासुबाई! मुलीनं उरकलं बॉयफ्रेंडसोबत गुपचुप लग्न...

मसाबा गुप्ताने 27 जानेवारी रोजी तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची लाडकी मुलगी मसाबा गुप्ता विवाहबंधनात अडकली आहे. आज सकाळी मसाबा गुप्ताने सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. मसाबा गुप्ताने 27 जानेवारी रोजी तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे. मसाबा गुप्ताने तिच्या लग्नाचे दोन सुंदर फोटो शेअर करून प्रेक्षकांना तिच्या आनंदात सामील केले आहे.

मसाबा गुप्ताच्या अचानक लग्नाची बातमी ऐकून चाहते खूप खूश आहेत. मसाबा गुप्ताने पती सत्यदीप मिश्रासोबत रोमँटिक पोस्ट टाकून लग्नाची घोषणा केली आहे. तिच्या लग्नाची पोस्ट शेअर करत मसाबा गुप्ताने कॅप्शनमध्ये लिहिले , "आज मी माझ्या प्रेमाशी लग्न केले आहे. येणाऱ्या आयुष्यात नाव प्रेम, शांती, स्थिरता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हसू. हे आयुष्य खूप मजेशीर असणार आहे".

मसाबा गुप्ताने तिच्या खास दिवसासाठी तिच्या कलेक्शनमधील सर्वात सुंदर लेहेंगा घातला होता. मसाबा गुप्ताने तिच्या खास दिवशी बेबी पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यासोबत तिने तिची आई नीना गुप्ता यांचे दागिने घातले होते. मसाबा गुप्ताचे पती स्त्यदीप मिश्रा यांनी आपल्या पत्नीसोबत ट्यून करण्यासाठी पिंक कुर्ता परिधान केला होता. मॅचिंग आउटफिट्समध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.

मसाबा गुप्ताचा वेडिंग लूक चाहत्यांना पसंत पडत आहे. स्लीक बन बनवताना मसाबाने तिच्या केसांमध्ये चंद्र आणि सूर्यासारख्या अॅक्सेसरीजसह तिचा लुक पूर्ण केला आहे. सोशल मीडियावर या जोडप्याला लग्नाच्या खूप शुभेच्छा मिळत आहेत. केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूडचे अनेक स्टार्स दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT