Actress Neena Gupta Team esakal
मनोरंजन

'वडिल माझे बॉयफ्रेंड, भूतकाळ सोडला, भविष्य़ाकडे पाहते'

मी अनेकदा एकटेपणाचा सामना केला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून नीना गुप्ताचे (Neena Gupta ) नाव घ्यावे लागेल. त्या त्यांच्या हटके स्वभावामुळे प्रसिध्द आहेत. तसेच एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनही त्या ओळखल्या जातात. नीना (Neena Gupta) वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत मांडत असतात. त्या त्यांच्या मित्र परिवारातील लग्न, करिअर सेमिनार्स, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. नीना या सध्या चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या एका मुलाखतीमुळे. त्यांनी यावेळी मोठा खुलासा केला आहे. Neena Gupta REVEALS She Was Lonely Because She Did Not Have Husband Or Partner

आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींविषयी नीना (Neena Gupta ) यांनी मुलाखतीतून सांगितले. त्यावेळी त्यांनी काही धक्कादायक गोष्टींबाबत सांगितले. आयुष्यात अनेकदा आपल्याला एकटेपणाला सामोरं जावं लागलं. तेव्हा निराशा आली होती. वाईट वाटायचे. नात्यांमध्ये कटूताही आली होती. अशावेळी काय करावं कोणी सांगत नव्हतं. मी माझ्या अटींवर माझं आयुष्य जगले. त्यात अनेकदा अपयशीही झाले. मात्र जे झालं ते स्वीकारलं. आव्हानाला सामोरी गेली.

नीनानं (Neena Gupta ) एका आरजेला सांगितले होते की, मी अनेकदा एकटेपणाचा सामना केला आहे. पती नाही, मित्र नाही. अशी माझी तेव्हा अवस्था होती. त्याविषयी कुणाला सांगणार. लोकं त्या परिस्थितीचा फायदा घेताना दिसून येतात. मी माझ्या भूतकाळाकडे फारसं लक्ष दिल नाही. कारण मी जर तसे केले असते तर मला त्याचा आणखी त्रास झाला असता. आणि मला तसे होऊ द्यायचे नव्हते. केवळ चित्रपटच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयीही नीना यांनी यावेळी काही खुलासे केले.

सातत्यानं एकटेपण येणं हे माझ्या आयुष्यात खुपदा झाले आहे. ज्यावेळी दीर्घकाळ मला कुणी बॉयफ्रेंड नव्हतं त्यावेळी माझे वडिल हेच माझे बॉयफ्रेंड होते. मला देवानं खुप काही दिले आहे. त्याने दिलेल्या ताकदीमुळे मला आतापर्यतचा टप्पा पार करता आला आहे. सध्या मी भविष्याक़डे लक्ष देत आहे. भूतकाळ विसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - देशभक्तीचा व्यापार केला जातोय- उद्धव ठाकरे

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT