Neena Gupta on Casting Couch e
मनोरंजन

Neena Gupta : 'तू आजची रात्र थांबणार नाहीस का'? नीना गुप्तांनी सांगितला तो अनुभव

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बोल्डनेस आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात.

युगंधर ताजणे

Neena Gupta on Casting Couch : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बोल्डनेस आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. वयाची साठी ओलांडली तरी नीनाजी यांचा प्रभाव हा काही कमी झालेला नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांत त्यांनी दहाहून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नीनाजी यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले असून त्यातील कित्येक खळबळजनक गोष्टी यापूर्वी समोर आल्या आहेत.

पंचायत सारख्या मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या नीनाजी यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ८० च्या दशकांत आपल्या बोल्डनेसनं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या नीनाजींनी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डससोबत नाव जोडले गेले होते. काही कारणास्तव त्यांच्या आयुष्यात वादळाला सुरुवात झाली त्यानंतर नीनाजी या रिचर्डसपासून वेगळ्या झाल्या. त्या बऱ्याच काळ त्या वेगळ्या मनस्थितीत होत्या.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

नीनाजी यांनी याविषयी अनेकदा खुलासाही केला होता. आपल्या बिनधास्त आणि परखड स्वभावामुळे वेगवेगळ्या संकटांना तितक्याच खंबीरपणे सामोऱ्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांच्या लस्ट स्टोरीजमधील भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका मुलाखतीमध्ये नीनाजी यांनी व्यक्त केलेलं मत हे अनेकांसाठी धक्कादायक ठरताना दिसत आहे. त्यांनी इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊच कशाप्रकारे चालते याविषयी सांगितलं आहे. आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आले की, ज्यांनी खूप काही शिकवले. अजूनही त्या प्रसंगांची आठवण आल्यास अंगावर काटा येतो. असे त्या सांगतात.

एका निर्मात्यानं मला चित्रपटात काम देतो म्हणून हॉटेलवर बोलावलं. त्यांना मला एक महत्वाचा रोल द्यायचा होता. मात्र त्यासाठी अट ठेवली होती. नीना यांनी हा किस्सा त्यांच्या सच कहू तो नावाच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, मला हॉटेलवर बोलावून माझ्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न त्या निर्मात्यानं केला होता. आजची रात्र जर थांबलीस तर....कदाचित तुझे भविष्य काही वेगळेच असेल. मी मात्र यासगळ्या गोष्टींनी खूपच भांबावून गेले होते. असेही नीना यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून धारदार १२ लोखंडी शस्त्रे जप्त

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT