Neena Gupta(Bollywood Actress) Esakal
मनोरंजन

Neena Gupta: साठी ओलांडली तरी रोमँटिक चित्रपटात काम करायची आहे इच्छा

Vaishali Patil

अभिनेत्री नीना गुप्ताही बॉलिवूडमधील एक कसदार अभिनेत्री आहे. ती तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी बरोबरच तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखली जाते. नीनानं आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगासमोर बेधडकपणे ठेवल आहे .

वयाच्या 63 व्या वर्षीही ही अभिनेत्री तिच्या लूक आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. नीना हिने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नुकतच नीना गुप्ता हिने अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. तिला अॅक्शन फिल्म आणि रोमँटिक लव्हस्टोरी करायच्या आहेत. त्याचबरोबर तिला साउथ चित्रपटही करायचे आहे.

नीनाला वाटतं की ती आता करिअरच्या करिअरच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे. तिला रोमांचक भूमिका साकारण्याची इच्छा आहे. आणि ही कधीही न संपणारी आहे. निनाचा 2018 चा 'बधाई हो' चित्रपट बॉक्स ऑफिस तुफान गाजला. या चित्रपटानंतर तिच्या करिअरला कलाटणी दिली. करिअरच्या या टप्प्यावर एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी पेलताना खूप छान वाटतल्याचही नीना यांनी सांगतिलं.

ज्यावेळी नीनाला विचारण्यात आलं की तिला अजून काही नवीन करायचं आहे का त्यावेळी तिने सांगतिले की तिला आता अॅक्शन, लव्हस्टोरी, हॉरर आणि बरचं काही करायचं आहे.

याबद्दल बोलतांना नीना म्हणते की, ' याबाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजते कारण मी अशा अनेक लोकांसोबत काम करत आहे ज्यांच्यासोबत काम करेल असं मला कधीच वाटले नव्हतं पण मला मणिरत्नम आणि त्याच्यासारखे इतर काही दाक्षिणात्य चित्रपट करायचे आहेत, कारण ते पूर्णपणे वेगळे आहे आणि मी ते करेन.'

2022 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या गुडबाय चित्रपटात ती दिसली होती. यात तिच्यासोबत रश्मिका मंदान्ना, सुनील ग्रोव्हर, पावेल गुलाटी आणि एली अवराम होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT