Neena Gupta Vacation In France:  Esakal
मनोरंजन

Neena Gupta France Vacation: नीना गुप्ताचा फ्रान्स व्हेकेशनचा व्हिडिओ व्हायरल! 64 व्या वर्षीही म्हणतेय, 'मौजा ही मौजा'

Vaishali Patil

Neena Gupta Vacation In France: बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. नुकतच त्यांना 'लस्ट स्टोरीज 2' या सिरिजमध्ये बोल्ड आजीच्या रुपात आपण पाहिलं. त्यांच्या या सिरिजमधील पात्राने सर्वांचेच लक्ष वेधले.

काहींनी त्यांना ट्रोल केले तर काहींनी त्यांच्या भुमिकेचे कौतुक केले. नीना यांना आपण आजवर अनेक सिनेमांमधून पाहिलंय. नीना गुप्तांच्या कारकिर्दीची सेकंड इनिंग सध्या जोरात सुरु आहे. वेबसिरीज असो किंवा सिनेमा त्यांचे चित्रपट सध्या जोरावर आहे.

नीना गुप्ता नेहमीच समाजाने घालून दिलेले नियम मोडून आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही देखील खुप चर्चेत असतात. वयाच्या 64 व्या वर्षीही नीना यांनी केवळ त्यांच्या वयातील लोकांनाच नाही तर तरुण चाहत्यांनाही आयुष्य आनंदाने आणि धैर्याने जगण्यासाठी प्रेरणा देत असतात.

सध्या नीना या पती विवेक मेहरासोबत फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यांनी या सुट्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

नीनाने इंस्टाग्रामवर त्यांचे अनेक रील शेअर केले आहेत आणि प्रत्येक रीलमध्ये त्या फक्त मजा करतांना दिसत आहे. या व्हिडिओत नेटकऱ्यांना त्यांचा फॅशन सेन्सचं देखील कौतुक केलं आहे.

नीना यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत त्या फ्रान्समधील एका रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत पती विवेक मेहरा देखील खूप एन्जॉय करत आहे. हा व्हिडिओ शेअर करतांना नीना गुप्ता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'Mauja hi mauja in Mougins, France!'

त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहते त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्यांचे कौतुक करत आहेत. काही त्याच्या वयावरुनही कमेंट करत आहेत. तर काही त्याच्या जीवन जगण्याच्या शैलीवरुन त्यांचे कौतुक करत आहे

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, नीना गुप्ता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' चित्रपटात दिसल्या होत्या. याशिवाय त्या 'इश्क नादान' मध्ये आणि 'पंचायत' या हिट वेब सीरिजच्या नव्या सीझनमध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT