Neetu singj-kapoor with ranbir kapoor(Mother-son together for ad shoot) Google
मनोरंजन

लगीनघाईत काढलेला रणबीर-नीतू यांचा सेल्फी चर्चेत;आलियाची आई म्हणाली...

नीतू कपूर यांनी रणबीरसोबत करत असलेल्या एका जाहिरातीच्या सेटवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या लग्नाची बातमी गेल्या काही दिवसांत वाऱ्यासारखी पसरली आहे. सोशल मीडियावर तर या बातमीची एक वेगळीच जादू पहायला मिळत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून अद्याप यावर काही अधिकृतरित्या बोललं गेलं नसलं तरी लग्नाच्या वेन्यूपासून,रणबीरच्या बॅचलर पार्टीपर्यंत ते अगदी दोघांच्या हनीमून पर्यंतच्या सगळ्या बातम्या मीडियाच्या माध्यमातून आलिया-रणबीरच्या चाहत्यांपर्यंतं पोहोचत आहेत. दरम्यान आता नीतू कपूर यांनी मुलगा रणबीर कपूर सोबत करत असलेल्या एका नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आहे. हे एका जाहिरातीचं शूट आहे,ज्याच्या शूटिंगच्या सेटवरचा एक फोटो नीतू कपूर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

रणबीर सोबतचा फोटो पोस्ट करीत नीतू यांनी लिहिलं आहे,''अपने जाने-जिगर के साथ अॅड शूट''. या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी लाइक केलं आहे. दिया मिर्झानं हार्ट इमोजी पोस्ट केलाय तर करिना कपूरची नणंद सबा अली खाननं लिहिलं आहे-'माशाहल्ला'. सोफी चौधरीनं लव्ह इमोजी पोस्ट केली आहे. तर आलियाची आई आणि रणबीरच्या होणाऱ्या सासुबाई सोनी राझदान यांनी 'वॉव्व' लिहीत फोटोला पसंती दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न १७ एप्रिल रोजी मुंबईत होत आहे. लग्नानंतर दोघेही आपापल्या कामात बिझी होणार असल्याचं बोललं जात आहे. आलिया आणि रणबीर पहिल्यांदा 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. रणबीरनं याआधी २०१३ मध्ये 'बेशरम' या सिनेमात आपली आई नीतू कपूरसोबत काम केलं होतं,या सिनेमात ऋषि कपूर देखील होते. रणबीर २०१८ मध्ये 'संजू' सिनेमात दिसला होता. त्यानंतर आता थेट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसेल. रणबीर काही दिवसांपूर्वी ऋषि कपूर यांचा मृत्यूपश्चात ओटीटीवर प्रदर्शित झालेला 'शर्माजी नमकीन' हा सिनेमा प्रमोट करताना दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT