Neetu Kapoor post related now katrina kaif mother reply 
मनोरंजन

Katrina Kaif Mother Post : 'खबरदार माझ्या मुलीबाबत...' कतरिनाच्या आईनं रणबीरच्या आईला सणसणीत उत्तर|

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या आईनं ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या त्या पोस्टवरून मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Neetu Kapoor post related now katrina kaif mother reply : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरच्या आईनं ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या त्या पोस्टवरून मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या नात्याबाबत अप्रत्यक्षरित्या भाष्य केले आहे. त्यात कुणाचे नाव घेतलेले नाही. मात्र पोस्टवरुन ती कुणाविषयी लिहिली गेली आहे. हे चाणाक्ष नेटकऱ्यांनी ओळखले आहे.

नीतू कपूर यांच्या व्हायरल झालेल्या त्या पोस्टवरुन आता त्यावर कतरिना कैफच्या आईनं देखील सणसणीत उत्तर दिलं आहे. तुम्ही जे काही बोलला आहात त्यात आदराची भावना नाहीच पण वेगळाच दृष्टिकोन दिसून येतो आहे. अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे. सोशल मीडियावर नीतू कपूर यांना दिलेल्या उत्तराची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

नीतू कपूर यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले होते की, त्यासाठीच की काय ते एकमेकांना सात वर्षे डेट करत होते. ते डेट करत होते याचा अर्थ असा नाही की, तो तुझ्याशी लग्न करेल. माझ्या काकांनी सहा वर्षे मेडिकलचा अभ्यास केला पण ते आता डीजे आहेत. नीतू यांची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. या पोस्टवर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, नीतू कपूर यांनी कतरिनाला टोमणे मारले आहे.

काय म्हणाली कतरिनाची आई?

कतरिनाची आईनं शेयर केलेल्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा अर्थ असा की, माझं संगोपन अशा पद्धतीनं करण्यात आले आहे की, प्रत्येकाचा आदर केला गेला पाहिजे. विनाकारण कुणाशी वाद घालण्यापेक्षा आपण आपले काम करत राहावे. हॉटेल बाहेर असणाऱ्या देखील तेवढाच आदर द्यायला हवा जेवढा आपण एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओला देतो. असे त्या शेयर केलेल्या पत्रामध्ये म्हटले गेले आहे.

त्या व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कतरिनाच्या आईची बाजू घेतली आहे. त्यांनी तुम्ही जे काही बोलल्या आहात ते अगदी योग्य असल्याचे सांगत कडक शब्दांत उत्तर दिले आहे. जशी आई तशी मुलगी अशा शब्दांत एका नेटकऱ्यानं कतरिनाच्या आईचे कौतूक केले आहे. काही दिवसांपासून रणबीरची आई नीतू कपूरच्या त्या पोस्टवरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT