neetu kapoor 
मनोरंजन

व्हिडिओ: नीतू कपूर यांनी 'घाघरा' गाण्यावर केला डान्स, रणबीर-आलियाच्या लग्नासाठी सुरु आहे तयारी?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर यांचं मुलगा रणबीर कपूरसोबत चांगलं बॉन्डिंग आहे. नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर साहनी अनेकदा तिच्या आईचे आणि भावाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. त्यातंच आता नीतू कपूर रणबीर कपूरच्या 'घाघरा' या गाण्यावर डान्स करताना दिसून आली. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर मास्टरजी नावाने प्रसिद्ध असलेल्या कोरिग्राफर राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नीतू कपूर मुलगा रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील 'घाघरा' गाण्यावर रिहर्सल करताना दिसतायेत. सिनेमातील या गाण्यात रणबीर कपूर आणि माधुरी दिक्षीत यांची जोडी होती. नीतू कपूर यांचा हा व्हायरल होत असलेला डान्स व्हिडिओ पाहून चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. अनेकांनी तर ही रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी तयारी सुरु असल्याचंच म्हटलंय. 

नीतू कपूर यांच्या आगामी सिनेमांबाबत बोलायचं झालं तर दिग्दर्शक राज मेहता यांच्या आगामी सिनेमात त्या दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात अनिल कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी देखील असतील. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर लवकरंच आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येईल.   

neetu kapoor rehearsing her dance moves on son ranbir kapoor song ghagra  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT