Neetu Kapoor  
मनोरंजन

Neetu Kapoor : 'मग कतरिनालाच सून का नाही केली'? रणबीरच्या आईलाच नेटकऱ्यांनी सुनावलं!

बॉलीवूडच्या कोणेएकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर या त्यांच्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Neetu Kapoor Trolled Katrina Kaif Ranbir Kapoor : बॉलीवूडच्या कोणेएकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर या त्यांच्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटी आहे. त्यांनी आता इंस्टावर जी पोस्ट शेयर केली आहे, त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना भलत्याच तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नीतू कपूर यांच्या त्या पोस्टवरुन त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, नीतूजी तुम्ही नेहमीच कतरिनाच्या विरोधात होता. तुम्हाला ती सून म्हणून नकोच होती. पण तुम्ही स्पष्टपणे तसे कधी बोलला देखील नाहीत. आणि आता तर त्या दोघांचे ब्रेक अप झालेस लग्न झाले तरी सुद्धा तुम्ही तिला टोमणे मारता हे काही बरोबर नाही. ते दोघे सात वर्षे एकमेकांसोबत होते.

दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्ही इतक्या वर्षांनी देखील तिच्यावर टीका का करता आहात, त्याचे काय कारण आहे, कतरीना जर तिच्या कामाशी प्रामाणिक आहे आणि ती कोणत्याही प्रकारे तुमच्याशी बोलण्याचा किंवा कमेंट करण्याचा प्रयत्न करत नाहीये तरी देखील तिला का बोलले जात आहे? तुमचे कुटूंब नेहमीच वेगळ्या प्रकारचे राहिले आहे, तर आणखी एका युझर्सनं लिहिलं आहे की, ती पोस्ट कदाचित रणबीर कपूरसाठी असेल.

Neetu Kapoor Trolled Katrina Kaif Ranbir Kapoor

नीतू कपूर यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यासाठीच की काय ते एकमेकांना सात वर्षे डेट करत होते. ते डेट करत होते याचा अर्थ असा नाही की, तो तुझ्याशी लग्न करेल. माझ्या काकांनी सहा वर्षे मेडिकलचा अभ्यास केला पण ते आता डीजे आहेत. नीतू यांची ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. या पोस्टवर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, नीतू कपूर यांनी कतरिनाला टोमणे मारले आहेत.

त्याचे काय आहे की, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. ते लग्नही करणार आहेत. अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र ते लग्न काही कारणास्तव होऊ शकलं नाही. दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना यामुळे कमालीचे वाईटही वाटले होते. २०१६ मध्ये हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम देखील केल्याचे दिसून आले.

दीपिका आणि कतरिनाच्या ब्रेक अपनंतर आलियाशी रणबीरची डेटिंग सुरु झाली. त्याच्याही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याच्या बातम्यांना जोरदार उधाण आले होते. अखेर त्यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी राहा नावाच्या मुलीला जन्म देील दिला. दुसरीकडे २०२१ मध्ये कतरिनानं विकी कौशल सोबत राजस्थानमध्ये लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT