Neha Dhupia  esakal
मनोरंजन

Neha Dhupia : नेहा माॅडल्सला बूट घालण्यास करायची मदत, आज आहे मोठी अभिनेत्री

अभिनेत्री नेहा धुपियाचा खडतर प्रवास

सकाळ डिजिटल टीम

Neha Dhupia Birthday : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहा धुपियाने मुंबईत येऊन फिल्मी दुनियेत नशीब आजमावण्यापूर्वी २००२ मध्ये 'फेमिना मिस इंडिया'चा किताब पटकावला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की नेहा धुपियाने एका मॉडेलला स्टेजवर बूट घालण्यास मदत केली होती. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा नेहाला लोक फारसे ओळखत नव्हते.

सुरुवातीला खडतर संघर्ष

२०११ मध्ये एका मुलाखतीदरम्यान नेहा धुपियाने मुंबईतील तिच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले होते. नेहा धुपियाने (Neha Dhupia) सांगितले की, त्या काळाने तिला जमीनशी जोडण्यास मदत केली.

मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात एका सौंदर्य स्पर्धेपासून केली होती. परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की मी उपस्थित असलेल्या पहिल्या फॅशन शोमध्ये बॅकस्टेज मॉडेल्सना शूज घालण्यास मदत करण्याचे काम करत होते.

पीसीडीएसमध्ये नेहाची भूमिका काय होती?

नेहा धुपिया म्हणाली की, आता जेव्हा ती फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करते तेव्हा तिला ही गोष्ट आठवते. नेहा धुपियाने तिच्या 'पप्पू कान्ट डान्स साला' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वृत्तसंस्था पीटीआयशी संवाद साधताना ही माहिती दिली. या चित्रपटात नेहा धुपियाने मुंबईतील डान्सरची भूमिका साकारली होती. (Bollywood News)

सेटवरचे संघर्षाचे दिवस आठवत

ती म्हणाली, 'मी नंतर सेटवर बॅकअप डान्सर्सचे निरीक्षण केले आणि त्यांची महत्त्वाकांक्षा, समर्पण आणि त्यांच्या व्यवसायाबद्दलची त्यांची वृत्ती पाहून मला माझ्या संघर्षाच्या दिवसांची आठवण झाली.' नेहा धुपिया म्हणाली की, प्रत्येक कलाकार आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संघर्षाच्या टप्प्यातून जात असला तरी ते स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करत राहावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT