Neha Dhupia shocking reveals on getting pregnant before marriage..  Esakal
मनोरंजन

Neha Dhupia नं लग्नाआधी,'मी प्रेग्नेंट आहे' असं घरच्यांना सांगितलं अन्.., काय आहे त्यानंतरच्या ७२ तासांची कहाणी? वाचा

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या अचानक लग्न करण्यानं बी-टाऊन पासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत सगळेच हैराण झाले होते.

प्रणाली मोरे

Neha Dhupia: बॉलीवू़ड अभिनेत्री नेहा धूपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली. २०१८ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते. दोघांच्या अचानक झालेल्या लग्नानं अनेकांना हैराण करून सोडलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा बीटाऊनमध्ये देखील वाऱ्यागत पसरली होती.

या बातमीनंतर चाहते पुन्हा एकदा हैराण झाले जेव्हा लग्नानंतर लगेचच नेहानं आपल्या प्रेग्नेंसीच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. लग्नाआधी प्रेग्नेंट होण्याविषयी नेहानं केलेला खुलासा अनेकांच्या पचनी पडला नव्हता आणि यावरनं अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल देखील केलं. लग्नाआधी आपण प्रेग्नेंट आहोत अशी बातमी आई-वडीलांना दिल्यावर त्यांची रिअॅक्शन कशी होती याचा आज पाच वर्षांनी नेहा धुपियानं खुलासा केला आहे.

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असलेली पहायला मिळते. दोन मुलांची आई बनलेल्या नेहानं काही दिवसांपूर्वीच त्या ७२ तासांविषयी खुलासा केला आहे, जे तिला तिच्या आई-वडीलांनी तिच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकल्यावर दिले होते.(Neha Dhupia shocking reveals on getting pregnant before marriage..)

नेहा धुपियानं टाइम्स नाउ डिजिटल सोबत संवाद साधला,त्या दरम्यान तिनं ५ वर्षापूर्वीचा खुलासा केला आहे जो कुणालाच माहित नाही. नेहा धुपियानं लग्नाआधी प्रेग्नेंट होण्याविषयी मोकळेपणानं संवाद साधला. जेव्हा तिच्या आईवडीलांना याविषयी कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा नेहा धुपियानं केला आहे.

अभिनेत्रीनं सांगितलं की,''आम्ही कोणत्याच तयारीशिवाय लग्न केलं होतं. लग्न करण्याआधी मी प्रेग्नेंट होते. त्यामुळे जेव्हा मी ही बातमी माझ्या आई-वडीलांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, ''हे खूप चांगलं झालं..पण तुमच्याकडे लग्नासाठी फक्त ७२ तास आहेत. मला अडीच दिवस दिले गेले,म्हणजे मी मुंबईत परत येईन आणि लग्न करेन. मग काय..आम्ही दोघे म्हणालो..चला आता लग्न करूया''.

आणखी एका मुलाखतीत नेहानं आपल्या आईच्या अंगद बेदी प्रती असलेल्या जिव्हाळयाविषयी देखील बातचीत केली. ती म्हणाली होती, ''माझी आई मनपिंदर उर्फ बबली धूपिया माझ्या आणि अंगदच्या नात्यानं खूश होती''.

अभिनेत्रीनं खुलासा केला की,'' मी तेव्हा इतर कुणालातरी डेट करत होते पण आई म्हणायची,'अंगद चांगला मुलगा आहे,तर तू दुसऱ्या कुणाला डेट का करतेयस?' माझ्या आईचा नुसता अंगदच्या नावाचा जप चालू असायचा. दुसरं कोणतं नाव निघायचच नाही''.

नेहा आणि अंगदची पहिली भेट जीममध्ये झाली होती. पहिल्याच नजरेत अंगद नेहाच्या प्रेमात पडला होता पण नेहाकडून तेव्हा तसं काहीच नव्हतं. मग एका मित्राच्या पार्टीत दोघांची भेट झाली आणि मग त्यानंतर हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढली आणि पुढे दोघांनी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT