neha rohanpreet
neha rohanpreet 
मनोरंजन

‘जब वुई मेट..’ नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचं लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, अजुनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नेहाच्या लग्नातील प्रत्येक सोहळा विशेष गाजला. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये नेहा-रोहनची चर्चा सुरुच आहे. यामध्येच सगळ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी होती. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यामुळेच अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत नेहा- रोहनने त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी शेअर केली आहे.

“आमच्या प्रेमाची सुरुवात झाली ती 'नेहु दा व्याह' या गाण्याच्या शूटपासून. सेटवर बऱ्याच वेळा मी त्याचं निरीक्षण केलं, तो प्रत्येकाशी आदराने आणि नीट वागत-बोलत होता. त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुलांमध्ये मला तो जास्त क्यूट वाटत होता. त्याला पाहिलं की मला कायम असं वाटायचं हा फक्त माझा आहे”, असं नेहा म्हणाली. 

नेहाप्रमाणेच रोहनप्रीतनेदेखील त्याच्या प्रेमाची कबुली दिली. “मला ती सगळ्या मुलींच्या तुलनेत वेगळी वाटली. त्यामुळे एक दिवस हिंमत करुन मी तिच्या समोर गेलो आणि तिला प्रपोज केलं. विशेष म्हणजे तिने देखील मला होकार दिला”, असं रोहनप्रीत म्हणाला. नेहा आणि रोहनप्रीत यांनी २४ ऑक्टोबर रोजी विवाह केला. यंदा २०२० मधील कलाविश्वातील सर्वात गाजलेला विवाहसोहळा म्हणून या दोघांच्या लग्नाकडे पाहिलं जातं.   

neha kakkar reveals love story with rohanpreet singh  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT