neha kakkar wont do other reality shows apart from indian idol heres why 
मनोरंजन

 'यापुढे  कोणताही रिअ‍ॅलिटी शो करणार नाही'; नेहा कक्करने घेतला महत्त्वाचा निर्णय

शर्वरी जोशी

आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. बॉलिवूडमधील अनेक गाण्यांना आपला आवाज देणारी नेहा सध्या इंडियन आयडॉल १२ या शोच्या परिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. लवकरच या कार्यक्रमात होळी स्पेशल भाग रंगणार आहे. त्यापूर्वी या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे ती कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा कक्कर चर्चेत आली आहे.

चर्चेत येत असलेल्या प्रोमोमध्ये नेहाने या शोमधील निहाल आणि पवनदीपसोबत ‘नैना’, ‘प्यार दो प्यार लो’ आणि ‘बद्री की दुल्हनिया’ या गाण्यांवर ताल धरला. विशेष म्हणजे यावेळी प्रेक्षकांनी दिलेली दाद पाहून नेहा भावूक झाली आणि तिने हा शो तिच्यासाठी खास असून हा शो सोडून अन्य रिअ‍ॅलिटी शो करणार नाही असं तिने सांगितलं.

"इंडियन आयडॉल माझ्यासाठी खूप खास आहे. या शोने मला खूप काही दिलं आहे. त्यामुळे हा शो सोडून मी अन्य कोणताही कार्यक्रम करु शकत नाही. या शोच्या संपूर्ण टीमे खूप कष्ट करुन हा शो तयार केला आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीमुळेच तो कलाविश्वाच्या इतिहासातील एक खास शो ठरला आहे", असं नेहा म्हणाली.

दरम्यान, इंडियन आयडॉल १२ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो पैकी एक आहे. आतापर्यंत या शोमुळे कलाविश्वाला अनेक गायक मिळाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT