Neha Marda gets rushed to hospital deo to complications in her final pregnancy phase sakal
मनोरंजन

Neha Marda Hospitalized:'बालिका वधू' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल; बाळंतपणादरम्यान प्रकृती खालावली

अभिनेत्री नेहा मर्दा गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असून प्रकृती खालावल्याने तिला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

Neha Marda Hospitalized : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दा गेली काही दिवस प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. पण प्रेग्नेंसीदरम्यान अचानक तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेहाची प्रकृती आता कशी आहे याबाबत अद्याप नेहा मर्दा किंवा तिच्या कुटुंबियांनी कोणीतीही माहिती दिलेली नाही. पण पुढचे दोन दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

(Neha Marda gets rushed to hospital deo to complications in her final pregnancy phase)

नेहा मर्दा आणि आयुष्मान अग्रवाल हे 2012 साली विवाहबंधनात अडकले. पण नेहाने अद्याप आई होण्याचा निर्णय घेतला नव्हता. चाहतेही तिच्याकडून गोड बातमीची वाट पाहत होते, पण तब्बल १० वर्षांनी नेहाने गोड बातमी दिली.

याबाबत नेहा म्हणाली होती की, 'मी आई होणार असल्याचं मला कळालं तेव्हा मला खूप आनंद झाला. आई होण्याची माझी खूप इच्छा होती. आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर आम्ही आई-बाबा होणार असल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. अनेकांनी मला बाळ होत नसल्याने टोमने देखील मारले. पण आता मी प्रेग्नंट असल्याचा जास्त आनंद आहे.' 

नेहाने 2005 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. नेहाने 'देवों के देव महादेव', 'डोली अरमानों की', 'पिया अलबेला', 'लाल इश्क' अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले प्रमुख भूमिका केल्या आहेत.

पण बालिका वधू' या मालिकेमुळे नेहाला जास्त लोकप्रियता मिळाली आहे. नेहा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. प्रेग्नेंसीसंबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे बेबी बंपचे फोटोशूटही बरेच गाजले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT