netizen open challenge to Vivek Agnihotri direct the film Manipur files on manipur violence SAKAL
मनोरंजन

Vivek Agnihotri: हिम्मत असेल तर मणिपूर फाईल्स बनवुन दाखवा, विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान

विवेक आता मणिपूर फाईल्स सिनेमा बनवणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे.

Devendra Jadhav

Vivek Agnihotri on Manipur: सध्या मणिपूर धुमसतंय. मणिपूर मध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली. या सगळ्या वातावरणात अशातच काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निगहोत्री यांना मात्र नेटकऱ्यांनी घेरलं आहे.

विवेक अग्नीहोत्री यांनी काश्मिर फाईल्ससारखा सिनेमा बनवुन संपुर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे वळवलं. हेच विवेक आता मणिपूर फाईल्स सिनेमा बनवणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. बघुया काय घडलं

(Vivek Agnihotri reacts to Twitter user)

मर्द असाल तर... विवेक अग्निहोत्रींना खुलं आव्हान

'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' या विषयाचा संदर्भ देत विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, 'काश्मिरी हिंदू नरसंहारावर भारतीय न्यायव्यवस्था आंधळी आणि मूक राहिली आहे.

ते अयशस्वी ठरले आहे आणि अजूनही आपल्या संविधानात दिलेल्या वचनानुसार काश्मिरी हिंदूंच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यात अपयशी ठरते.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर युजरने कमेंट केली की, "वेळ वाया घालवू नका, जा आणि मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा जर तुम्ही खरे माणूस असाल."

विवेक अग्निहोत्रींनी दिलं हे उत्तर

विवेक अग्निहोत्रीनेही युजरच्या कमेंटकडे दुर्लक्ष केले नाही आणि प्रतिक्रिया देत लिहिले, 'माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, पण मीच सर्व सिनेमे बनवु का? तुमच्या 'टीम इंडिया'मध्ये दुसरा कोणी मर्द चित्रपट निर्माता नाही का? असा रिप्लाय विवेकने दिलाय.

विवेकची ही पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली असून, सोशल मीडिया यूजर्स त्यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

मणिपूर हिंसाचार

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासुन जातीय हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान दोन महिलांवर अत्याचार करत त्यांना नग्न फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यनंतर देशभरात खळबळ उडाली होती.

यादरम्यान सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी मणिपूरमधील सर्व घटनांचा तपास वाढवला आहे. अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला याबद्दलची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT