Katrina Kaif Google
मनोरंजन

'कतरिना कैफ वाढदिवशी १६ जुलैला देणार मोठी बातमी...', वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ लाइमलाइटपासून दूर राहत असल्याचं निदर्शनास पडलं आहे,त्यामुळे तिच्यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क समोर येत आहेत.

प्रणाली मोरे

कतरिना कैफला (Katrina Kaif) करण जोहरच्या(Karan Johar) ५० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीत शेवटचं पाहिलं होतं. अर्थाते ते देखील मे महिन्यात. पण तेव्हापासून ती कुठेच दिसलेली नाही. अगदी एअरपोर्टवर देखील तिला स्पॉट केलेलं नाही. तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्टही काही आठवड्यांपूर्वी केलेली आहे. ते देखील तिच्या 'भूत पोलिस' सिनेमासंदर्भातली. आणि तेव्हापासून ती सगळीकडनं गायब झाली आहे. पण यावर मात्र नेटकऱ्यांनी आपले तर्क-वितर्क मांडायला सुरुवात केली आहे.

इन्स्टाग्रामवर एका इंग्रजी वेबसाईटनं कतरिनाच्या लाइमलाइटपासून दूर राहण्याचं कारण थेट नेटकऱ्यांनाच विचारलं. तेव्हा अक्षरशः चाहत्यांनी तर्क-वितर्कांचा पाऊस पाडला. सगळ्यात जास्त चाहत्यांनी तर कतरिना विकी कौशलच्या बाळाला जन्म देणार असल्याचाच अंदाज लावला आहे. एका चाहत्यानं तर म्हटलं आहे की,'कतरिना या महिन्यात १६ जुलैला मोठी बातमी देणार आहे. कतरिना कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात म्हणजे पार्टी,एअरपोर्टवरही नजरेस पडत नाहीय आणि सोशल मीडियावरनंही गायब आहे आणि याचं काय कारण आहे हे ती १६ जुलैला वाढदिवशीच सांगेल', असं हा चाहता म्हणाला आहे. काही चाहत्यांनी म्हटलं की,'करणच्या 'कॉफी विथ करण'च्या शूटमध्येही ती सहभाग घेणार नाही हे कळलं आहे म्हणजे नक्कीच मोठी गूड न्यूज आहे तिच्याकडेट.

कतरिनाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर लवकरच ती आपल्याला 'फोनभूत' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील दिसणार आहेत. कोरोना दरम्यान या सिनेमाची घोषणा झाली होती आणि गेल्या वर्षाच्या शेवटी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं. 'फोन भूत' येत्या ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमातही कतरिना दिसणार आहे. कतरिनानं काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्टसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या सिनेमाचं शूटिंग पुढील वर्षी होणार असल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT