काजोलचा 'गुप्त' सिनेमा संदर्भात मोठा खुलासा,म्हणाली,'माझा तो निर्णय...' Kajol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol on playing negative role in 'Gupt', reveal some secrets..

काजोलचा 'गुप्त' सिनेमा संदर्भात मोठा खुलासा,म्हणाली,'माझा तो निर्णय...'

काजोल(Kajol) म्हणजे बॉलीवूडची(Bollywood) एक गुणी अभिनेत्री. ती जरी म्हणत असली की अपघातानं मी अभिनेत्री झाले पण तिच्या सिनेमातील भूमिका पाहिल्यावर तिचं ते म्हणणं मात्र काही पटत नाही. तिच्या रक्तात अभिनय मुरला आहे असं म्हटलं तर अतिश्योक्ती नक्कीच होणार नाही. तिनं आजवर केलेल्या सिनेमांपैकी अधिक सिनेमांवर हिट-सुपरहिट-ब्लॉकबस्टरचेच शिक्के बसलेले. तिच्या पदरात फ्लॉप सिनेमे तसे कमीच पडलेले. लग्नानंतर ती अभावानं सिनेमे करत असली तरी तिचा अभिनय पहायला मात्र चाहते कायम उत्सुक दिसतात.(Kajol on playing negative role in 'Gupt', reveal some secrets..)

हेही वाचा: काय आहे प्रसिद्ध घागरा बॉय जयनील मेहताची स्टोरी? लोक आधी म्हणायचे 'गे'

आज आपण खास काजोल विषयी बोलतोय त्याचं निमित्त आहे तिच्या 'गुप्त' सिनेमानं २५ वर्ष पूर्ण केल्याचं. प्रियकरावर वेड्यासारखं प्रेम करणारी प्रियसी ते सिरीयल किलर अशी काजोलची भूमिका 'गुप्त' सिनेमात होती. सिनेमात तिनं खलनायिका रंगवलेली होती. त्यावेळी खरंतर बड्या सिनेमातून मुख्य अभिनेत्रीचं पात्र रंगवून चर्चेत आलेली स्टार असतानाही तिनं 'गुप्त' मध्ये खलनायिकेची भूमिका स्विकारली तेव्हा सगळ्यांनी तिला मुर्खात काढलं. तर काहींना तिच्या निर्णयानं धक्का बसला. पण आज काजोलनं हा निर्णय त्यावेळी काय विचार करुन घेतला होता याविषयी २५ वर्षांनी खुलासा केला आहे.

हेही वाचा: Koffee with Karan: करण गेस्टला देतो फक्त हॅम्पर,स्वतः घेतो आठ अंकी रक्कम

गुप्त हा एक थ्रिलर,सस्पेन्स वाढवणारा सिनेमा होता. गेल्याच आठवड्यात या सिनेमाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष झाली आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव राय यांनी केलं आहे. १९९७ साली रिलीज झालेल्या या सिनेमात बॉबी देओल,मनिषा कोईराला,काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या.

हेही वाचा: KAALI Controversy: लीना मणिमेकलाईच्या अडचणी वाढल्या, दिल्ली कोर्टाचं समन्स

बॉबी देओलनं यात साहिल ही व्यक्तीरेखा साकारली आहे. ज्याच्यावर आपल्या सावत्र वडीलांच्या(राज बब्बर) खुनाचा आरोप लागतो. तो जेलमधून पळून येतो आणि खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेतो आपली गर्लफ्रेंड इशा(काजोल) आणि मैत्रीण शितल(मनिषा कोईराला)यांच्या मदतीने.

हेही वाचा: बर्थ डे दिवशी गौरव तनेजाला अटक, म्हणाला,'बीबी के सरप्राइज से डर लगता है..'

पण सिनेमाच्या शेवटी जेव्हा खरा खुनी कोण हे नाव समोर येतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का लागतो. हा सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना याची प्रचिती आलीच असेल. अर्थात काजोल ही सिनेमाची हिरोईन नसून खलनायिका आहे हे त्यावेळी सगळ्यांनाच शॉक करुन गेलं. 'गुप्त' सिनेमा दिग्दर्शक राजीव राय आणि शब्बीर बॉक्सवाला यांनी लिहिला होता. तर याचे गीतकार आनंद बक्षी होते.

हेही वाचा: टी.व्ही अभिनेत्रीसोबत Online Fraud,फोनवर बोलताना ५ सेकंदात लाखोंचा गंडा

काजोलनं आज २५ वर्षांनतर या सिनेमाविषयी काही खुलासे करताना म्हटलं आहे की, '''गुप्त' सिनेमा करणं हा माझ्यासाठी एक धाडसी निर्णय होता. ज्यावेळी दिग्दर्शक राजीव राय मला स्टोरी एकवण्यासाठी आले होते तेव्हा त्यांना वाटलं नव्हतं की मी सिनेमाला होकार देईन. तो दोन तास बसून मला स्टोरी ऐकवताना अक्षरशः घामाघूम झाला होता. आणि अखेर मी हा सिनेमा करेन असं त्याला म्हटलं. माझी बहिण तनिषा त्यावेळी होती, तिनं देखील मला लगेच होकार दे असं म्हटलं. आणि त्यामुळे काही प्रश्नच उरला नाही,तो सिनेमा करण्याचा माझा निर्णयही नंतर योग्य ठरला''.

हेही वाचा: 7०च्या दशकातील अभिनेत्रीच्या बायोपीकमध्ये जॅकलिन,निघृण हत्येनं झालेला अंत

काजोल जिने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे','बाजीगर','ये दिल्लगी' सारख्या सिनेमांत अभिनेत्री म्हणून काम केलं होतं,आणि ओळख बनवली होती,तिनं पहिल्यांदा 'गुप्त' सिनेमासाठी 'बेस्ट व्हिलन' साठी त्यावेळचा फिल्मफेअर पटकावला.

हेही वाचा: 'मी pansexual आहे ,स्वतःच्याच शरीराची लाज वाटायची', मोनिका डोग्राचा खुलासा

यावेळी काजोलच्या आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी पहिल्यांदा सिनेमा आवडला अशी कमेंट दिली होती. काजोल म्हणाली, ''माझ्यासाठी ती खूप मोठी प्रतिक्रिया होती. कारण माझ्या आईला माझ्या सिनेमातील भूमिका आवडतात पण माझे सिनेमे आवडत नाहीत. पण 'गुप्त'साठी पहिल्यांदा ती म्हणाली होती, काय सिनेमा आहे,व्वा!''

Web Title: Kajol On Playing Negative Role In Gupt Reveal Some

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top