New 6 Movie web serise OTT Released Fabruary First Week Netflix esakal
मनोरंजन

6 OTT Releases Of This Week: नव्या महिन्यात मनोरंजनाचा नवा तडका! कोणत्या वेबसीरिज, चित्रपट होणार रिलीज?

ओटीटीचे चाहते आणि नेटकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

New 6 Movie web serise OTT Released Fabruary First Week Netflix : ओटीटीचे चाहते आणि नेटकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. यावेळी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भाषेतील वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्यात कोणत्या नव्या मालिका अन् चित्रपट प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

गेल्या काही वर्षांपासून ओटीटीवरील मनोरंजनाचा टक्का हा वाढताना दिसतो आहे. कोरोनाच्या काळात वेगानं लोकप्रिय झालेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मला नेटकऱ्यांची, सिनेप्रेमींची मोठी पसंती मिळताना दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात डिझ्ने हॉटस्टार, जिओ सिनेमा, झी ५, नेटफ्लिक्स अन् प्राईम व्हिडिओवर मनोरंजनाचा धमाका दिसून येणार आहे.

1. After Everything

प्रसिद्ध लेखक हार्डिन स्कॉट यांच्या कलाकृतीवर आधारित आफ्टर इव्हरेथिंग नावाचा चित्रपट हा नेटफ्लिक्सवर १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये जोसेफ लँगफोर्ड आणि फिनेस टिफेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

2. Mr & Mrs Smith

या चित्रपटामध्ये दोन अनोळखी व्यक्तींची कथा मांडण्यात आली आहे. त्यांना गुप्तहेर म्हणून नोकरी मिळते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडते ते प्रभावीपणे मिस्टर अँड मिसेस स्मिथमध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर फेब्रुवारीच्या २ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

3. Mighty Bheem's Playtime

ही अॅनिमेटेड सीरिज नेटफ्लिक्सवर उद्या (२९ जानेवारी) रोजी प्रदर्शित होणार आहे. माईटी भीमच्या यापूर्वी व्हायरल झालेल्या ट्रेलर अन् टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.

4. The Seven Deadly Sins: Four Knights of the Apocalypse

एका तरुण मुलाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या मालिकेचे नाव द सेव्हन डेडली सीन्स- फोर नाईट्स ऑफ द अपोकॅल्पसी असे आहे. एका अज्ञात गोष्टीचा शोध आणि त्याचे रहस्य हे या मालिकेतून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. नेटफ्लिक्सवर ही मालिका ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

5. Dawshom Awbotaar

जिशू सेनगुप्ता, प्रोसेनजित चॅटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य आणि जया अहासन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होईचोई नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. एका सीरिअल किलरची गोष्ट त्यात मांडण्यात आली आहे.

6. Orion and the Dark

नेटफ्लिक्सवर २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ओरियन अँड द डार्क नावाच्या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. डार्क मुव्हीची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक वेगळी पर्वणी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT